लता कलवार यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड
By Admin | Updated: August 29, 2014 23:33 IST2014-08-29T23:33:25+5:302014-08-29T23:33:25+5:30
औरंगाबाद : राजस्थानातील जयपूर येथे होणार्या ३३ व्या राष्ट्रीय सिनियर तायक्वांदो स्पर्धेसाठी औरंगाबाद येथील राष्ट्रीय खेळाडू लता कलवार यांची पंच म्हणून निवड झाली आहे. २ ते ६ सप्टेंबदरम्यान होणार्या या राष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतातून २0 पंचांची निवड करण्यात आली आहे. त्यात लता कलवार यांचा समावेश आहे.

लता कलवार यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड
औ ंगाबाद : राजस्थानातील जयपूर येथे होणार्या ३३ व्या राष्ट्रीय सिनियर तायक्वांदो स्पर्धेसाठी औरंगाबाद येथील राष्ट्रीय खेळाडू लता कलवार यांची पंच म्हणून निवड झाली आहे. २ ते ६ सप्टेंबदरम्यान होणार्या या राष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतातून २0 पंचांची निवड करण्यात आली आहे. त्यात लता कलवार यांचा समावेश आहे.लता कलवार या राष्ट्रीय प्रशिक्षक. त्यांनी आतापर्यंत जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत पंच म्हणूनही कार्य केले आहे. सिनियर राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांची दुसर्यांदा पंच म्हणून निवड झाली आहे. या निवडीबद्दल औरंगाबाद हौशी तायक्वांदो संघटनेचे अध्यक्ष के. डी. शार्दूल, राज्य संघटनेचे सदस्य नीरज बोरसे, संतोष सोनवणे, अमोल थोरात, चंद्रशेखर जेऊरकर, राजू जाधव, गजेंद्र गवंडर, योगेश विश्वासराव, अविनाश नलावडे, डोनिका रूपारेल, अंतरा हिरे आदींनी अभिनंदन करीत राष्ट्रीय स्पर्धेसाठी कलवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत.