शेवटच्या सामन्यातही सदर्न एक्स्प्रेस पराभूत
By Admin | Updated: September 17, 2014 02:08 IST2014-09-17T02:03:32+5:302014-09-17T02:08:04+5:30
चॅम्पियन्स लीग टी-2क् स्पध्रेतील शेवटच्या क्वालिफायर लढतीत लाहोर लायन्सने 55 धावांनी सदर्न एक्स्प्रेसवर विजय साजरा केला.

शेवटच्या सामन्यातही सदर्न एक्स्प्रेस पराभूत
रायपूर : चॅम्पियन्स लीग टी-2क् स्पध्रेतील शेवटच्या क्वालिफायर लढतीत लाहोर लायन्सने 55 धावांनी सदर्न एक्स्प्रेसवर विजय साजरा केला. विजयासाठी 164 धावांचा पाठलाग करणा:या एक्स्प्रेसचा डाव 1क्9 धावांत गुंडाळून लाहोरने तालिकेत दुस:या स्थानावर झेप घेतली.
नाणोफेक जिंकून एक्स्प्रेसने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. उमर सिद्धीक आणि अहमद शेहजाद यांनी दमदार खेळ करून लायन्सला 4क् धावांची आघाडी मिळवून दिली. ही जोडी परवेज महरूफ याने सिद्धीकला यष्टिरक्षक कुशल परेराकरवी झेल बाद करून तोडली. लायन्सच्या खात्यात 12 धावांची भर घातल्यानंतर त्यांचे दोन फलंदाज झटपट बाद झाले. परंतु मोहम्मद हाफिज आणि साद नसीम यांनी त्यांना धक्का दिला. हाफिजच्या फटकेबाजीला नसीमने साजेशी साथ देत संघाला शंभरी पार करून दिली. चारिथ जयापंथीने 17व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर नसीमला बाद करून लायन्सचा हा झंझावात रोखला. मात्र हाफिजने एका बाजूने फटकेबाजी सुरूच ठेवली. त्याने 4क् चेंडूंत 5 चौकार व 4 षट्कार खेचून 67 धावांची मजबूत खेळी करून संघाला समाधानकारक धावांचा पल्ला गाठून दिला. लायन्सने निर्धारित 2क् षटकात 6 बाद 164 धावा केल्या.
या लक्ष्याचा पाठलाग करताना एक्स्प्रेसची तारांबळ उडाली. एैयाज चिमा, वाहब रिआज आणि अदनान रसुल यांनी एक्स्प्रेसच्या गतीला ब्रेक लावला. चिमाने धावफलकावर 27 धावा असताना तिलकरत्ने संपथ आणि कुसल परेरा या सलामीवीरांना माघारी धाडले. त्यापाठोपाठ एक्स्प्रेसचे सर्व फलंदाज 1क्9 धावांत गार झाले.
लाहोर लायन्स :
4उमर सिद्धिक झे. परेरा गो. महरुफ 18, अहमद शेहजाद झे. संदकन गो. महरूफ 29, नासीर जमशेद झे. मुबारक गो. महरुफ 1, मोहम्मद हाफिज झे. परेरा गो. जयारत्ने 67, साद नसीम झे. जयारत्ने गो. जयापंथी 31, उमर अकमल नाबाद 11, वाहब रियाज धावबाद (ए परेरा/कुसल परेरा) 3. अवांतर - 4; एकूण - 6 बाद 164 धावा. गोलंदाजी - जयापंथी 4-क्-45-1, परेरा 2-क्-9-क्, जयारत्ने 4-क्-29-1, परवेझ महरुफ 4-क्-28-3.
सदर्न एक्स्प्रेस :
4टी संपथ पायचीत गो. चिमा 18, परेरा झे. अकमल गो. चिमा 8, गुनाथीलाका त्रि. गो. चिमा क्, मुबारक झे. सिद्धिक गो. रसूल 35, परेरा झे. सिद्धिक गो. रियाज 16, महरुफ त्रि. गो. रसूल क्, प्रसन्ना झे. नसीम गो. रियाज 4, परेरा त्रि. गो. अली 3, जयरत्ने गो. जमशेद गो. हाफिज 16, जयापंथी 4*, संदकान धावबाद 1. अवांतर - 4; एकूण - सर्वबाद 1क्9 धावा. गोलंदाजी - हाफिज 4-क्-26-1, चिमा 3-क्-15-3, रियाज 4-क्-2क्-2, अली 3-क्-14-1, रसूल 4-क्-32-2.