सोशल-सुयश यांच्यात अंतिम लढत

By Admin | Updated: September 3, 2015 23:05 IST2015-09-03T23:05:45+5:302015-09-03T23:05:45+5:30

सोलापूर: शालेय शहरस्तरीय 14 वर्षे वयोगटातील व्हॉलीबॉल स्पर्धेत सोशल इंग्लिश स्कूल आणि सुयश गुरुकुल संघांनी अंतिम फेरी गाठली आह़े

In the last match between the Social-Suyash | सोशल-सुयश यांच्यात अंतिम लढत

सोशल-सुयश यांच्यात अंतिम लढत

लापूर: शालेय शहरस्तरीय 14 वर्षे वयोगटातील व्हॉलीबॉल स्पर्धेत सोशल इंग्लिश स्कूल आणि सुयश गुरुकुल संघांनी अंतिम फेरी गाठली आह़े
पहिल्या उपांत्य सामन्यात सुयश गुरुकुलने जय जवान जय किसान सैनिकी स्कूलचा 25-11, 25-12 अशा फरकाने पराभव केला़ दुसर्‍या उपांत्य सामन्यात सोशल इंग्लिश स्कूलने स्वामी विवेकानंद हायस्कूलचा 25-17, 18-25, 15-13 अशा फरकाने मात केली़
या स्पर्धेत 14, 17 व 19 वर्षे वयोगटात 72 संघांनी भाग घेतला आह़े या स्पर्धेचे उद्घाटन सोशल इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या सॉलेहा वडवान यांच्या हस्ते झाल़े यावेळी अ़जब्बार शेख,जुबेर शेख,सचिव अशोक पाटील, जुनेद वळसंगकर आदी उपस्थित होत़े सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक सादिक शेख यांनी केल़े (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: In the last match between the Social-Suyash