ललिता बाबरला सुवर्ण
By Admin | Updated: August 19, 2014 00:41 IST2014-08-19T00:41:42+5:302014-08-19T00:41:42+5:30
राष्ट्रीय अॅथ्लेटिक्स स्पर्धेच्या तीन हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात 2क्1क् ची आशियाई सुवर्ण विजेती सुधासिंग हिला सोमवारी मागे टाकले.

ललिता बाबरला सुवर्ण
पतियाळा : महाराष्ट्राची खेळाडू ललिता बाबर हिने येथे सुरू असलेल्या फेडरेशन चषक सिनियर राष्ट्रीय अॅथ्लेटिक्स स्पर्धेच्या तीन हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात 2क्1क् ची आशियाई सुवर्ण विजेती सुधासिंग हिला सोमवारी मागे टाकले. या जेतेपदासह तिने आगामी आशियाडसाठी देखील भारतीय संघात स्थान निश्चित केले आहे.
ललिताने नऊ मिनिटे 52. 34 सेकेंद वेळेसह अव्वल स्थान संपादन केले. उत्तर प्रदेशची सुधासिंग 9 :53.34 अशा वेळेसह दुस:या स्थानावर राहीली. तामिळनाडूचा निखल चिटरासू याने उंच उडीत 2.21 मीटर उडी घेत सुवर्ण जिंकले. त्याचा हा नवा स्पर्धा विक्रम देखील ठरला. महिलांच्या तिहेरी उडीत केरळची एम. ए. प्रज्युषा हिने 13.39 मीटरसह सुवर्ण पटकावले. राष्ट्रीय विक्रमाची मानकरी मायुखा जानी ही 13.34 मीटरसह तिस:या स्थानावर घसरली. (वृत्तसंस्था)