लाहिरी ताईपेमध्ये संयुक्त दुसर्‍या स्थानावर

By Admin | Updated: September 13, 2014 22:59 IST2014-09-13T22:59:02+5:302014-09-13T22:59:02+5:30

ताईपे: भारताचा अनिर्वाण लाहिरी तीन फेरीनंतर यांगडेर टूर्नामेंट प्येअर गोल्फ स्पर्धेमध्ये संयुक्त दुसर्‍या स्थानावर आह़े तो आघाडीवर असलेल्या फिलिपिन्सच्या मिगुएल ताबुएनापेक्षा एका शॉटने पिछाडीवर आह़े त्याच्याकडे यंदा दुसरे किताब जिंकण्याची संधी आह़े लाहिरीने आज येथे तिसर्‍या फेरीमध्ये चार अंडर 68 चे स्कोअर केल़े आता त्याचे एकूण स्कोअर 9 अंडर 207 झाले आहेत़ ताबुएना तिसर्‍या फेरीमध्ये सात अंडर 65 च्या एकूण स्कोअरसह आघाडीवर आह़े थायलंडचा दिग्गज खेळाडू थावोर्न विराटचंट 67 देखील संयुक्त दुसर्‍या स्थानावर आह़े अन्य भारतीयांमध्ये राहिल गंगजी 69 संयुक्त 13 व्या, तर राशीद खान 72 सह संयुक्त 16 व्या स्थानावर आह़े चिरागकुमार 69 च्या स्कोअरसह एकूण दोन अंडर 214 सह संयुक्त दहाव्या स्थानावर आह़े ज्योती रंधावा तिसर्‍या फेरीमध्ये 74 च्या खराब कामगिरीनंतर संयुक्त 46 व्या

Lahiri joined Taipei in second place | लाहिरी ताईपेमध्ये संयुक्त दुसर्‍या स्थानावर

लाहिरी ताईपेमध्ये संयुक्त दुसर्‍या स्थानावर

ईपे: भारताचा अनिर्वाण लाहिरी तीन फेरीनंतर यांगडेर टूर्नामेंट प्येअर गोल्फ स्पर्धेमध्ये संयुक्त दुसर्‍या स्थानावर आह़े तो आघाडीवर असलेल्या फिलिपिन्सच्या मिगुएल ताबुएनापेक्षा एका शॉटने पिछाडीवर आह़े त्याच्याकडे यंदा दुसरे किताब जिंकण्याची संधी आह़े लाहिरीने आज येथे तिसर्‍या फेरीमध्ये चार अंडर 68 चे स्कोअर केल़े आता त्याचे एकूण स्कोअर 9 अंडर 207 झाले आहेत़ ताबुएना तिसर्‍या फेरीमध्ये सात अंडर 65 च्या एकूण स्कोअरसह आघाडीवर आह़े थायलंडचा दिग्गज खेळाडू थावोर्न विराटचंट 67 देखील संयुक्त दुसर्‍या स्थानावर आह़े अन्य भारतीयांमध्ये राहिल गंगजी 69 संयुक्त 13 व्या, तर राशीद खान 72 सह संयुक्त 16 व्या स्थानावर आह़े चिरागकुमार 69 च्या स्कोअरसह एकूण दोन अंडर 214 सह संयुक्त दहाव्या स्थानावर आह़े ज्योती रंधावा तिसर्‍या फेरीमध्ये 74 च्या खराब कामगिरीनंतर संयुक्त 46 व्या स्थानावर घसरला गेला आह़े कालपर्यंत तो संयुक्त 26 व्या स्थानावर होता़

Web Title: Lahiri joined Taipei in second place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.