कुमार शिंदे अंतिम फेरीत

By Admin | Updated: December 23, 2015 01:10 IST2015-12-23T01:10:41+5:302015-12-23T01:10:41+5:30

जेव्हीपीजी संघाचा महादेव भोगले आणि पुण्याचा कुमार शिंदे यांनी उपांत्य फेरीतील आपआपल्या लढती जिंकताना सातव्या प्रो क्लासिक ६ - रेड स्नूकर स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

Kumar Shinde in final round | कुमार शिंदे अंतिम फेरीत

कुमार शिंदे अंतिम फेरीत

मुंबई : जेव्हीपीजी संघाचा महादेव भोगले आणि पुण्याचा कुमार शिंदे यांनी उपांत्य फेरीतील आपआपल्या लढती जिंकताना सातव्या प्रो क्लासिक ६ - रेड स्नूकर स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
इस्लाम जिमखान्याच्या वतीने सुरू असलेल्या या स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात कुमार आणि भोगले यांनी अनुक्रमे अनंत व अजिंक्य या येवले पिता-पुत्र जोडीला नमवले. पूना क्लबचे प्रतिनिधित्व करीत असलेल्या कुमारने ५ फ्रेममध्ये रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात गोरेगाव स्पोटर््सच्या अनंत यांना पराभूत केले. पहिले तीन फ्रेम सहज जिंकून ३-० अशी आघाडी घेतलेल्या कुमारला चौथ्या फ्रेममध्ये अनंत यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. या वेळी अनंत बाजी पलटवणार अशी अशा होती. मात्र पाचव्या फ्रेममध्ये संयमी खेळ करताना कुमारने बाजी मारली आणि अनंत यांचा ४७-१३, ४५-०, ३९-१३, ३०-४४, ३८-४९ असा पराभव केला.
दुसऱ्या बाजूला २०१० सालचा उपविजेता असलेल्या भोगलेला रेडिओ क्लबच्या अजिंक्यने चांगलेच झुंजवले. पहिला फ्रेम जिंकून आघाडी घेतलेल्या भोगलेला दुसऱ्या फ्रेममध्ये धक्का देत अजिंक्यने सामना बरोबरीत आणला. यानंतर महादेवने सलग दोन फ्रेम जिंकताना ३-१ अशी मजबूत आघाडी घेतली. पाचव्या फ्रेममध्ये अजिंक्यने केवळ एका गुणाने २६-२५ असा निसटता विजय मिळवत आपले आव्हान कायम ठेवले. मात्र सहाव्या फ्रेममध्ये पुन्हा एकदा भोगलेने आपला सर्व अनुभव पणास लावताना फ्रेम जिंकला आणि २८-२१, २३-३७, ३७-३, ३५-९, २५-२६, ३४-२४ अशा ्नगुणांनी अटीतटीच्या सामन्यात झुंजार विजय मिळवून अंतिम फेरी गाठली. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Kumar Shinde in final round