शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
3
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
4
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
5
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
6
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
7
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
8
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
9
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
10
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
11
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
12
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
13
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
14
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
15
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
16
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
17
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

कुलदीपमुळे भारताची पकड कायम

By admin | Published: March 26, 2017 12:55 AM

उजव्या हाताने फिरकी मारा करणाऱ्यांच्या तुलनेत डावखुरे फिरकीपटू मनगटाला पुरेसे वळण का देत नाहीत

हर्षा भोगले लिहितो..उजव्या हाताने फिरकी मारा करणाऱ्यांच्या तुलनेत डावखुरे फिरकीपटू मनगटाला पुरेसे वळण का देत नाहीत, हा माझ्यासाठी नेहमी उत्सुकतेचा विषय राहिला आहे. हेदेखील कौशल्य आहे. कुठल्याही हाताने फिरकी मारा करा, त्यात बोटांची कमाल असतेच; पण जो नजरेत भरेल, मनगटाचे कौशल्य दाखविणारा, असा डावखुरा गोलंदाज भारतात आतापर्यंत पाहायला मिळाला नव्हता. मी कुलदीप यादवबद्दल बोलतो आहे. दुबईत ३ वर्षांपूर्वी १९ वर्षे गटाच्या विश्वचषकात कुलदीपचा मारा पाहायला मिळाला. तो फारच कोवळा होता. चायनामॅन आणि गुगली गोलंदाजी करीत असला, तरी फारच मंद वाटला. मागच्या वर्षी मात्र त्याच्या चेंडूत वेग जाणवला. या सुधारणेमुळेच आज तो भारतीय संघात दाखल झाला असावा.धरमशालाच्या खेळपट्टीवर त्याचा अप्रतिम मारा पाहून कोणाही युवा गोलंदाजाला कुलदीपसारखी गोलंदाजी करायला आवडेल. यादवने हँड्सकोंबला टाकलेला तो चेंडू पाहिल्यानंतर विस्मयकारकता जाणवली. फुललेंथ चेंडूवर हँड्सकोंबला ड्राईव्हचा फटका मारायचा होता; पण काही सुचण्याआधीच चेंडू त्याची दांडी गुल करून गेला. मॅक्सवेल तर यादवची लेगस्पिन गुगली समजूदेखील शकला नाही. तोदेखील बोल्ड झाला. कुलदीपचा हात आणि चेंडू सोडण्याचे कौशल्य अतिशय नाट्यमय आहे. हे कौशल्य पाहणेदेखील रंजक ठरते. या बळावर कुलदीप आंतरराष्ट्रीय स्तरावर फार लोकप्रिय तसेच यशस्वी ठरू शकतो.स्टीव्ह स्मिथने मालिकेत आज तिसऱ्या शतकाची सहजपणे नोंद करताच आॅस्ट्रेलिया धावडोंगर उभारेल, असे दिसत होते. कुलदीपने मात्र त्यांचे स्वप्न धुळीस मिळवून भारताला चढाओढीत परत आणले. स्मिथच्या शतकानंतरही पाहुण्यांना ३०० वर थोपविण्यात यश मिळाले ते कुलदीपमुळेच. भारताच्या वाट्याला जे एक षटक खेळण्याचा योग आला. त्यात हेजलवूडचे चेंडू उसळी घेताना दिसले. भारतीय गोलंदाजांनी निर्णायक कसोटीत फलंदाजांसाठी प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला आहे. आज रविवारचा दिवस फलंदाजांचा असेल. मोठी खेळी करायची झाल्यास बाहेर जाणाऱ्या चेंडूंवर सावध राहावे लागेल. बाहेर जाणाऱ्या चेंडूला छेडण्याचा मोहदेखील आवरावाच लागेल.