शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

Paris Olympic मध्ये मराठी डंका! कोल्हापुरच्या पठ्ठ्याची फायनलमध्ये धडक; स्वप्नीलकडून पदकाची आशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 14:33 IST

swapnil kusale Latest News : कोल्हापुरच्या सुपुत्राची फायनलमध्ये धडक.

Paris Olympic 2024 Updates In Marathi : पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्रातील स्वप्नील कुसाळेने चांगली कामगिरी केली. तो ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. कोल्हापुरचा सुपुत्र असलेल्या स्वप्नीलने ५९० गुणांसह सातवे स्थान मिळवून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. भारताचा आणखी एक शिलेदार ऐश्वर्य प्रताप सिंग ११व्या क्रमांकावर राहिला अन् तो अंतिम फेरीला मुकला. खरे तर अव्वल आठ खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात. ऐश्वर्य प्रतापला पहिल्या आठमध्ये स्थान मिळवता न आल्याने त्याचे आव्हान संपुष्टात आले. त्यामुळे कोल्हापुरचा पठ्ठ्या भारताला पदक मिळवून देणार का हे पाहण्याजोगे असेल. 

नेमबाज स्वप्निल कुसाळे कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातील आहे. ६ ऑगस्ट १९९५ मध्ये जन्मलेल्या स्वप्निलने पॅरिसच्या धरतीवर चमक दाखवली. स्वप्निलचा ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास खूपच भारी आहे. अभिनव बिंद्राला २००८ च्या ऑलिम्पिकमध्ये खेळताना पाहण्यासाठी स्वप्निलने १२वीच्या परिक्षेकडे कानाडोळा केला. २००९ मध्ये वयाच्या १४व्या वर्षी त्याच्या वडिलांनी स्वप्निलला महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा प्रबोधिनी योजनेत दाखल केले. तिथूनच त्याचा क्रीडा क्षेत्रातील प्रवास सुरू झाला. सुरुवातीच्या काळात त्याने नेमबाजीतील आपले कौशल्य विकसित करण्यासाठी पुण्याला जाण्यापूर्वी नाशिकमध्ये प्रशिक्षण घेतले.

दरम्यान, कौतुकास्पद कामगिरी करताना स्वप्निलने पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्स स्पर्धेत ५९०-३८x गुणांसह सातवे स्थान पटकावले. अंतिम फेरीत अव्वल आठ प्रवेश करतात त्यात त्याने सातव्या स्थानी मजल मारली. त्याचा अंतिम सामना १ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता होणार आहे. 

स्वप्नील सुरेश कुसाळे या ग्रामीण भागातील खेळाडूने आपल्या मेहनतीच्या जोरावर ऑलिम्पिकपर्यंत मजल मारली. महाराष्ट्रातून पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंना महाराष्ट्र सरकारने पन्नास लाखांची मदत केली आहे. सध्या रेल्वे मध्ये टि.सी असणारा स्वप्नrल पुण्यातील बालेवाडी येथील क्रीडा संकुलात सराव करत होता. ऑलिम्पिक स्पर्धेत पात्र ठरल्यानंतर तो दिल्ली येथील रेंजवर सरावासाठी गेला होता. स्वप्नील आपल्या सर्वोत्तम खेळांचे चांगले प्रदर्शन करून देशासाठी सुवर्ण पदक मिळवून देईल याची आम्हाला खात्री आहे असे उद्गार वडिल सुरेश कुसाळे (सर) व आई सरपंच अनिता सुरेश कुसाळे यांनी दैनिक लोकमतशी बोलताना काढले. स्वप्नीलच्या या यशाने कांबळवाडीचे गाव सर्वदूर पसरले. 

टॅग्स :swapnil kusaleस्वप्नील कुसाळेIndiaभारतkolhapurकोल्हापूरparis olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४