कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर, मुंबई विभागाची बाजी राज्यस्तरीय शालेय कबड्डी क्रीडा पानासाठी...
By Admin | Updated: October 4, 2014 22:55 IST2014-10-04T22:55:19+5:302014-10-04T22:55:19+5:30
फोटो ०४एसएनएसपीओ१ - राज्यस्तरीय शालेय कबड्डीतील विजेत्यांचा गौरव करताना क्रीडा व युवक संचालनालयाच्या सहायक संचालिका सुवर्णाताई बारटक्के, एन. बी. मोटे, ॲड. चिमण डांगे, पंकज शिरसाट, युवराज नाईक, भगवान बोते.

कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर, मुंबई विभागाची बाजी राज्यस्तरीय शालेय कबड्डी क्रीडा पानासाठी...
फ टो ०४एसएनएसपीओ१ - राज्यस्तरीय शालेय कबड्डीतील विजेत्यांचा गौरव करताना क्रीडा व युवक संचालनालयाच्या सहायक संचालिका सुवर्णाताई बारटक्के, एन. बी. मोटे, ॲड. चिमण डांगे, पंकज शिरसाट, युवराज नाईक, भगवान बोते.आष्टा : येथील अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुलात आयोजित राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत १९ वर्षाखालील मुले व मुलींच्या गटात कोल्हापूरने, १७ वर्षाखालील मुलांच्या गटात औरंगाबादने, तर मुलींच्या गटात मुंबई विभागाने तसेच १४ वर्षाखालील मुलात नागपूर, तर मुलींमध्ये नागपूरने बाजी मारली. विजेत्या खेळाडूंना क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या सहायक संचालिका सुवर्णाताई बारटक्के यांच्याहस्ते सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपसंचालक एन. बी. मोटे, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त पंकज शिरसाट, प्रो-कबड्डी दिल्ली दबंग संघाचा खेळाडू काशिलिंग आडके, संजय पाटील, जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक, माजी प्राचार्य विश्वास सायनाकर, एस. टी. माने, प्रा. भगवान बोते, दादासाहेब आवाड, संस्थेचे सचिव ॲड. चिमण डांगे, प्रा. आर. ए. कनाई, व्यवस्थापक सुनील शिणगारे, दीपक अडसूळ, किसनराव गावडे उपस्थित होते. प्रदीप वेंगुर्लेकर यांनी प्रास्ताविक केले.१९ वर्षाखालील मुलांमध्ये कोल्हापूरने औरंगाबादवर, तर लातूरने नाशिकवर विजय मिळवत तिसरा क्रमांक पटकावला. १९ वर्षाखालील मुलींमध्ये कोल्हापूरने पुणे विभागावर एकतर्फी विजय मिळविला, तर मुंबईने अमरावतीवर विजय मिळवित तृतीय क्रमांक पटकावला.१७ वर्षाखालील मुलांमध्ये औरंगाबादने अमरावतीवर मात करीत प्रथम क्रमांक पटकावला. पुणे विभागाने लातूरवर एका गुणाची आघाडी घेत तिसरा क्रमांक पटकावला. १७ वर्षाखालील मुलींमध्ये मुंबईने लातूरवर विजय मिळविला, तर पुणे विभागाने नाशिकवरआघाडी घेत तृतीय क्रमांक पटकावला. १४ वर्षाखालील मुलांच्या गटात नागपूरने लातूरवर, तर कोल्हापूरने रोमहर्षक सामन्यात औरंगाबादवर २ गुणांनी विजय मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. १४ वर्षाखालीली मुलींच्या गटात पुणे विभागाने कोल्हापूरवर एकतर्फी विजय मिळविला. औरंगाबादने नागपूरवर मात करीत तृतीय क्रमांक पटकाविला.कोल्हापूर विभागात १९ वर्षे वयोगटातील कृष्णा मदने, रवींद्र कुमावत, सतपाल कुमावत, कन्हैया बोडरे, प्रदीप माने, अनिकेत बोडरे, रोहन तेवटे, क्रांती पाटील यांनी चमकदार खेळ केला. १७ वर्षाखालील मुलींमध्ये पूजा पाटील, गौरी पाटील, रेश्मा मोरे, पल्लवी जाधव, ऋजुता जाधव, योगीता पाटील या मुलींनी उत्कृष्ट चढाई व उत्कृष्ट पकडी घेऊन क्रीडा रसिकांची मने जिंकली. विजेत्यांचा प्रमुख पाहुण्यांच्याहस्ते गौरव करण्यात आला. प्राचार्य सुभाष पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)