कोहलीवर आदळला जॉन्सनचा बाऊन्सर, भारत ५ बाद ३६९

By Admin | Updated: December 11, 2014 15:16 IST2014-12-11T08:52:53+5:302014-12-11T15:16:47+5:30

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू फिल ह्युज याचा बाऊन्सर लागून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच भारतीय कर्णधार विराट कोहलीवरही बाऊन्सर आदळला आणि मैदानावर एकच शांतता पसरली.

Kohli's bouncer, India's bouncer, 36 9 after 5 | कोहलीवर आदळला जॉन्सनचा बाऊन्सर, भारत ५ बाद ३६९

कोहलीवर आदळला जॉन्सनचा बाऊन्सर, भारत ५ बाद ३६९

ऑनलाइन लोकमत

अॅडलेड, दि. ११ - ऑस्ट्रेलियाचा  क्रिकेटपटू फिल ह्युज याचा बाऊन्सर लागून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच भारतीय कर्णधार विराट कोहलीवरही बाऊन्सर आदळला आणि मैदानावर एकच शांतता पसरली. अर्धशतक झळकवणारा मुरली विजय बाद झाल्यावर कोहली फलंदाजीसाठी मैदानात आला. फलंदाजी करत असताना गोलंदाज मिशेल जॉन्सन याचा एक बाऊन्सर कोहलीच्या हेल्मेटवर आदळला आणि सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. गोलंदाज जॉन्सनही थोड्या काळासाठी गंभीर झाला. विराटने तो चेंडू चुकवला खरा, पण सर्वांच्याच मनात फिलची आठवण ताजी झाली. या घटनेनंतर सर्व ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी कोहलीकडे धाव घेतली आणि त्याची विचारपूस केली. कोहलीनेही हेल्मेट काढून आपण ठीक असल्याचे सर्वांना समजावले. त्याला कोणतीही दुखापत झाली नसल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. मैदानावर एरवी अतिशय आक्रमक खेळ करणारे ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या भावनिकतचे यावेळी दर्शन घडले. आपला संघ सहकारी ह्युजच्या मृत्यूतून ते अद्यापही सावरू शकलेले नाहीत, हेच या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले. 

दिवसाअखेर भारताची स्थिती मजबूत, ५ बाद ३६९ 

कर्णधार विराट कोहलीचे शानदार शतक (११५)  आणि विजय, पुजारा, रहाणे यांच्या अर्धशतकांमुळे भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीच्या तिस-या दिवसाखेर ५ गडी गमावत ३६९ धावा केल्या आहेत. 

ऑस्ट्रेलियाने त्यांचा पहिला डाव ५१७ धावांवर घोषित केल्यानंतर मुरली विजय (५२), शिखर धवन (२५) खेळण्यास उतरले. ते बाद झाल्यानंतर विराट कोहलीने पुजारासोबत (७३) भारताचा डाव सावरला. मात्र थोड्याच वेळात पुजारा व रहाणे (६२) तंबूत परतले. त्यानंतर विराटने शानदार शतक झळकावले. मात्र ११५ धावांवर खेलत असताना जॉन्सनच्या चेंडूवर तो हॅरीसकडे झेल देऊन तो बाद झाला. तिस-या दिवसाचा खेळ संपताना रोहित शर्मा (३३) व वृद्धीमान सहा (१) खेळत असून भारत सध्या १४८ धावांनी पिछाडीवर आहे.

ऑस्ट्रेलियातर्फे लियॉन व जॉन्सनने २ तर हॅरीसने १ बळी टिपला.

 

 

 

 

Web Title: Kohli's bouncer, India's bouncer, 36 9 after 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.