शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

म्हणून कोहलीला फटकावले होते : प्रशिक्षक शर्मा

By admin | Published: May 27, 2017 12:42 AM

टीम इंडिया १ जूनपासून सुरू होत असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडला रवाना झाली. ‘मिनी वर्ल्डकप’ मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेत विराट कोहली टीम इंडियाचे नेतृत्व करीत आहे

टीम इंडिया १ जूनपासून सुरू होत असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडला रवाना झाली. ‘मिनी वर्ल्डकप’ मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेत विराट कोहली टीम इंडियाचे नेतृत्व करीत आहे. कोहली हा आक्रमक स्वभावासाठी ओळखला जातो. मैदानातील आक्र मक वृत्तीमुळे अनेकदा कोहलीला टीकाही सहन करावी लागली. याच आक्र मक स्वभावामुळे कोहलीला बालपणी प्रशिक्षकांचा मारदेखील खावा लागला होता.कोहलीचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनीच याबद्दलचा खुलासा केला. ज्येष्ठ क्रीडा पत्रकार विजय लोकपल्ली यांच्या ‘ड्रिव्हन : द विराट कोहली स्टोरी’ पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते उपस्थित होते. कोहली लहानपणापासूनच खूप हट्टी असल्याचे राजकुमार यांनी सांगितले. सोबतच विराटकडून कधी कोणती चूक झाली तर त्याला राजकुमार यांचा मार देखील खावा लागला .‘‘विराटला मी केवळ दम देत नसे. कारण केवळ दम दिल्याने तो ऐकायचा नाही. अनेकदा मला त्याला थोबाडीत मारावे लागले आहे.’’, असे राजकुमार म्हणाले. ‘‘कोहली नेहमी मोठ्या खेळाडूंमध्ये जाऊन खेळायचा. त्याच्या वयाचे खेळाडू त्याला बाद करण्यात अपयशी ठरायचे मग कोहलीला कंटाळा यायचा. त्यावेळी कोहली फक्त दहा वर्षांचा होता.’’, असे राजकुमार शर्मा म्हणाले.मला नाही बॅटिंग मिळाली तर...कोहली बालपणापासून स्वत:च्या फलंदाजीबाबत खूप दक्ष आहे. प्रतिस्पर्धी संघ कमी धावांवर गारद झाला की विराट सलामीला फलंदाजीसाठी हट्ट करायचा. ‘मला बॅटिंग मिळाली नाही तर मग?’, असा निरागस प्रश्न तो नेहमी विचारायचा.