आॅस्ट्रेलियात कसे खेळायचे हे कोहलीला माहीत आहे : टेलर
By Admin | Updated: December 14, 2014 23:51 IST2014-12-14T23:51:18+5:302014-12-14T23:51:18+5:30
पहिल्या कसोटीत चांगली कामगिरी करणाऱ्या विराट कोहलीची आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मार्क टेलरने स्तुती केली आहे.

आॅस्ट्रेलियात कसे खेळायचे हे कोहलीला माहीत आहे : टेलर
अॅडिलेड : पहिल्या कसोटीत चांगली कामगिरी करणाऱ्या विराट कोहलीची आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मार्क टेलरने स्तुती केली आहे. आॅस्ट्रेलियात कसे खेळायचे, हे विराटला माहीत असल्याचे त्याने म्हटले आहे. टेलर म्हणाला, ‘मी पहिल्या दिवसाचा खेळ झाल्यानंतर त्याच्याशी बोललो होतो. त्याला येथे कसे खेळायचे हे माहीत आहे. त्याने फक्त आपल्या खेळातच नाही, तर कर्णधार म्हणूनही स्वत:वर विश्वास ठेवला. कर्ण शर्माला खेळवण्याचा निर्णय मला खूप आवडला.’ असे सांगून टेलर म्हणाला,’ ही मालिका चुरशीची होईल. भारत २०११ मध्ये येथे ४-०ने पराभूत झाला होता, तर आॅस्ट्रेलिया २०१३मध्ये भारतात ४-० असा पराभूत झाला. मात्र, पहिली कसोटी पाहिल्यानंतर असा निकाल लागेल, असे मला वाटत नाही.