कोहली, शिखरचे शतक, भारत २ बाद २५५

By Admin | Updated: August 13, 2015 13:30 IST2015-08-13T13:27:46+5:302015-08-13T13:30:38+5:30

भारताचा भरवशाचा फलंदाज शिखर धवन (नाबाद ११९) आणि कर्णधार विराट कोहलीच्या (नाबाद १०२) शानदार शतकाच्या जोरावर भारताने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत २५५ धावा करत ७० धावांची आघाडी मिळवली.

Kohli, century of the peak, India 2 255 | कोहली, शिखरचे शतक, भारत २ बाद २५५

कोहली, शिखरचे शतक, भारत २ बाद २५५

ऑनलाइन लोकमत

गाले, दि. १३ - भारताचा भरवशाचा फलंदाज शिखर धवन ( नाबाद ११९) आणि कर्णधार विराट कोहलीच्या ( नाबाद १०२) शानदार शतकाच्या जोरावर भारताने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत २५५ धावा केल्या आहेत.
अश्विनच्या फिरकीमुळे पहिल्या दिवसाचा खेळ गाजलेला असतानाच दुस-या दिवशी शिखर धवन व कोहलीने सावध खेळीस सुरूवात केली. उपहारापर्यंत धवनचे शतक पूर्ण होऊन भारताने चांगली आघाडी मिळवली, त्यानंतर कोहलीनेही शतक झकावत भारताला अडीचशे धावांचा टप्पा पार करून दिला. भारताने ७४ षटकांत २५५ धावा करत श्रीलंकेवर ७०  धावांची आघाडी मिळवली आहे. 

Web Title: Kohli, century of the peak, India 2 255