नरसिंगचे कृत्य जाणून बुजून; क्रीडा लवादाचा ठपका
By Admin | Updated: August 23, 2016 09:23 IST2016-08-23T05:02:32+5:302016-08-23T09:23:10+5:30
नरसिंग यादवने अनेकदा प्रतिबंधित उत्तेजक द्रव्य जाणून बुजून गोळ्यांच्या रुपात सेवन केल्याचा निष्कर्ष क्रीडा लवादाने काढला.

नरसिंगचे कृत्य जाणून बुजून; क्रीडा लवादाचा ठपका
नवी दिल्ली : चार वर्षांची बंदी घालण्यात आलेल्या नरसिंग यादवने अनेकदा प्रतिबंधित उत्तेजक द्रव्य जाणून बुजून गोळ्यांच्या रुपात सेवन केल्याचा निष्कर्ष क्रीडा लवादाने काढला. पुरावे सिध्द करण्यात नरसिंगला अपयश आल्याचे लवादाने म्हटले. संपूर्ण सुनावणीत ‘वाडा’ने मांडलेली बाजूच क्रीडा लवादाने मान्य केली. नरसिंगचे पहिल्या डोप चाचणीतील आलेल्या परिक्षणातून असा निष्कर्ष निघतो की, त्याने मिथोडाईन गोळ्यांच्या रुपात किमान दोनवेळा सेवन केले असावे. पाण्यात नकळतपणे इतके प्रमाण दिसून येत नसल्याचा दावा त्यांंनी केला आहे.