केकेआरचे बंगळुरूसमोर १७८ धावांचं आव्हान

By Admin | Updated: April 11, 2015 21:44 IST2015-04-11T21:44:38+5:302015-04-11T21:44:38+5:30

कोलकाता नाईट रायडर्सविरुध्द रॉयल चॅलेंजर बंगळुरू यांच्यात सुरु असलेल्या आयपीएल सामन्यात कोलकाताने बंगळुरूसमोर १७८ धावांचं आव्हान ठेवले आहे.

KKR's 178 runs in front of Bangalore | केकेआरचे बंगळुरूसमोर १७८ धावांचं आव्हान

केकेआरचे बंगळुरूसमोर १७८ धावांचं आव्हान

ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. ११ - कोलकाता नाईट रायडर्सविरुध्द रॉयल चॅलेंजर बंगळुरू यांच्यात सुरु असलेल्या आयपीएल सामन्यात कोलकाताने बंगळुरूसमोर १७८ धावांचं आव्हान ठेवले आहे. बंगळुरूकडून खेळणारा ख्रिस गेलच्या खेळीकडे अनेकांच्या लक्ष लागले आहे.
टॉस जिंकणा-या बंगळुरू संघाच्या कर्णधाराने कोलकाताला प्रथम फलंदाजी करण्यास पाचारण केले. कोलकाताची सुरुवात चांगली झाली पण त्यानंतर कोलकाताचा डाव गडगडला. कोलकाताकडून गौतम गंभीरने सर्वाधिक ५८ धावा केल्या. रॉबिन उथप्पा ३५, मनीष पांडे २३, सूर्यकुमार यादव ११ धावांवर बाद झाले. कोलकाताचा डाव १५० धावांच्या आत आटोपणार की काय असे वाटत असतानाच रसेलने आक्रमक फलंदाजी केली. रसेलने केलेल्या अवघ्या १७ चेंडूत नाबाद ४१ धावांच्या जोरावर कोलाकाताने ६ बाद १७७ धावा केल्या.

Web Title: KKR's 178 runs in front of Bangalore