क्रीडाक्षेत्रला विकासाची ‘किक’

By Admin | Updated: July 11, 2014 01:13 IST2014-07-11T01:13:32+5:302014-07-11T01:13:32+5:30

अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या भाषणातून जाणवली; परंतु केवळ खंत व्यक्त न करता त्यांनी या क्षेत्रच्या विकासासाठी ठोस पावले उचलली आहेत.

'Kick' for development of sports sector | क्रीडाक्षेत्रला विकासाची ‘किक’

क्रीडाक्षेत्रला विकासाची ‘किक’

नवी दिल्ली : मानवी जीवनाच्या जडणघडणीत आणि व्यक्तिविकासात क्रीडाक्षेत्रचे योगदान मोठे आहे; परंतु आपल्या देशात क्रीडाक्षेत्र मुख्य प्रवाहापासून कोसो दूर आहे. ही खंत अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या भाषणातून जाणवली; परंतु केवळ खंत व्यक्त न करता त्यांनी या क्षेत्रच्या विकासासाठी ठोस पावले उचलली आहेत. सर्व क्षेत्रंना भरभरून देताना मोदी सरकारने क्रीडाक्षेत्रलाही विकासाची ‘किक’ मारली. 
जम्मू आणि काश्मीरमध्ये अनेक गुणवंत खेळाडू आहेत; परंतु तेथे क्रीडा सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांच्या गुणवत्तेला मर्यादा येत असल्याचे जेटली म्हणाले. येथील खेळाडूंना मोठे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, याकरिता येथील इनडोअर आणि आऊटडोअर स्टेडियमला आंतरराष्ट्रीय सुविधा देण्यासाठी 2क्क् कोटी निधी मंजूर करण्यात आला. तसेच मणिपूर येथे क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याकरिता 1क्क् कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. 
देशाच्या विविध राज्यांना क्रीडाक्षेत्रच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर क्रीडा अकादमी उभारून त्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुविधा असतील.   यात प्रामुख्याने नेमबाजी, तिरंदाजी, बॉक्सिंग, कुस्ती, वेटलिफ्टिंग आणि विविध ट्रॅक व फिल्ड या खेळांचा समावेश असेल. देशाच्या उत्तरेकडील पर्वतरांगांमधील राज्यांत विविध खेळ खेळले जातात. अशा खेळांना प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रय} असेल. त्याकरिता क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले जाईल आणि त्यात शेजारील नेपाळ आणि भूतान देशांसह भारतातील जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम आणि ईशान्येकडील राज्यांना आमंत्रित केले जाईल. आशियाई आणि राष्ट्रकुल स्पध्रेत सहभागी होणा:या क्रीडापटूंच्या प्रशिक्षणासाठी 1क्क् कोटींची तरतूद करण्यात येणार असल्याचे जेटली यांनी सांगितले.  (वृत्तसंस्था)
 
981.19
कोटींचा निधी चालू आर्थिक वर्षाकरिता मंजूर करण्यात आला असून, गतवर्षाच्या तुलनेत तो 196 कोटींनी अधिक आहे.
 
85 कोटींचा अतिरिक्त निधी स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाला (साई) देण्यात आला आहे. तो आता 4क्5.1क् कोटींवर गेला.
 
20  कोटी निधी राजीव गांधी खेल अभियानासाठी मंजूर केला असून, तो पूर्वी 1क्4.85 कोटी होता.

 

Web Title: 'Kick' for development of sports sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.