शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

अचंता शरथ कमलला 'खेलरत्न', दिनेश लाड यांना 'द्रोणाचार्य' पुरस्कार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 06:26 IST

Khelratna Award : भारताचा स्टार आणि अनुभवी टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल याला यंदाचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला. राष्ट्रपती भवनात ३० नोव्हेंबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कमलला गौरविण्यात येईल.

नवी दिल्ली : भारताचा स्टार आणि अनुभवी टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल याला यंदाचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला. राष्ट्रपती भवनात ३० नोव्हेंबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कमलला गौरविण्यात येईल. त्याचप्रमाणे, भारताचा क्रिकेट कर्णधार रोहित शर्मा आणि अष्टपैलू शार्दूल ठाकूर यांचे शालेय प्रशिक्षक दिनेश लाड यांना द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला.केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या वतीने सोमवारी रात्री क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. २५ खेळाडूंना प्रतिष्ठेचा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन, एच. एस. प्रणॉय यांच्यासह बॉक्सर निकहत झरीन, ॲथलिट एल्डस पॉल, अविनाश साबळे यांचाही समावेश आहे. दिनेश लाड (क्रिकेट, द्रोणाचार्य जीवनगौरव), सुमा शिरूर (दिव्यांग नेमबाजी, द्रोणाचार्य), अविनाश साबळे (ॲथलेटिक्स, अर्जुन पुरस्कार), सागर ओव्हळकर (मल्लखांब, अर्जुन पुरस्कार) आणि स्वप्निल पाटील (दिव्यांग जलतरणपटू, अर्जुन पुरस्कार) यांचा समावेश आहे.

यंदाचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न : अचंता शरथ कमल (टेबल टेनिस) अर्जुन पुरस्कार : सीमा पूनिया (ॲथलेटिक्स), एल्डस पॉल (ॲथलेटिक्स), अविनाश साबळे (ॲथलेटिक्स), लक्ष्य सेन (बॅडमिंटन), एच. एस. प्रणॉय (बॅडमिंटन), अमित (बॉक्सिंग), निकहत जरीन (बॉक्सिंग), भक्ती कुलकर्णी (बुद्धिबळ), आर. प्रज्ञाननंदा (बुद्धिबळ), दीप ग्रेस इक्का (हॉकी), सुशीला देवी (ज्युदो), साक्षी कुमारी (कबड्डी), नयन मोनी सैकिया (लॉनबॉल), सागर ओव्हळकर (मल्लखांब), इलावेनिल वालारिवान (नेमबाजी), ओमप्रकाश मिठारवाल (नेमबाजी), श्रीजा अकुला (टेबल टेनिस), विकास ठाकुर (भारोत्तोलन), अंशू (कुश्ती), सरिता (कुश्ती), परवीन (वुशू), मानसी जोशी (दिव्यांग बॅडमिंटन), तरुण ढिल्लो (दिव्यांग बॅडमिंटन), स्वप्निल पाटील (दिव्यांग जलतरणपटू), जर्लिन अनिका जे. (बधिर बॅडमिंटन). द्रोणाचार्य पुरस्कार (नियमित) : जीवनजोत सिंग तेजा (तिरंदाजी), मोहम्मद अली कमर (बॉक्सिंग), सुमा शिरूर (दिव्यांग नेमबाजी) आणि सुजीत मान (कुश्ती). द्रोणाचार्य पुरस्कार (जीवनगौरव) : दिनेश लाड (क्रिकेट), बिमल घोष (फुटबॉल) आणि राज सिंग (कुस्ती). ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार : अश्विनी अकुंजी (ॲथलेटिक्स), धरमवीर सिंह (हॉकी), बी. सी. सुरेश (कबड्डी), नीर बहादुर गुरंग (दिव्यांग ॲथलेटिक्स). राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार : ट्रान्स स्टेडिया इंटरप्रायजेझ प्रायव्हेट लिमिटेड, कलिंगा सूचना प्राैद्योगिकी संस्था, लडाख स्की आणि स्नोबोर्ड संघटना. मौलाना अबुल कलाम आझाद चषक : गुरुनानक देव युनिव्हर्सिटी, अमृतसर.

टॅग्स :Indiaभारत