शहरं
Join us  
Trending Stories
1
जून ते सप्टेंबर ९९टक्के पाऊस; कोकण, नाशिक, पूर्व विदर्भात उत्तम पाऊस होण्याचा अंदाज
2
'या' चार राज्यांमध्ये मोठा उलटफेर होणार; भाजप जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता
3
"मला T20 World Cup बघायचाही नाही, जेव्हा मी...", रियान परागचं अनोखं विधान
4
मे महिन्यात देशभरात उष्माघाताचे ४६ बळी; तीन महिन्यांत ५६ मृत्यू, महाराष्ट्रात ११ जण मृत्युमुखी
5
आजचे राशीभविष्य: सरकारी लाभ, यश-कीर्ती वृद्धी; पद-प्रतिष्ठा वाढ, सुखकारक दिवस
6
अरुणाचलमध्ये भाजपच; सिक्कीम ‘एसकेएम’चेच; दोन राज्यांमधील विधानसभा निवडणूक
7
शिक्षक मतदारसंघासाठी भाजपची उमेदवारी नक्की कोणाला?
8
प्रदोष शिवरात्रीचा शुभ संयोग: ‘असे’ करा व्रताचरण; पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व अन् मान्यता
9
पंचग्रही अद्भूत शुभ योग: ७ राशींना लाभ, लॉटरीची संधी; राजकारण्यांना यश, इच्छापूर्तीचा काळ!
10
WI vs PNG : हलक्यात घेऊन चालणार नाही! नवख्या संघानं वेस्ट इंडिजला घाम फोडला, कसाबसा सामना जिंकला
11
पंचग्रही योग: ‘या’ ५ मूलांकांना सुख-समृद्धी काळ, धनलाभाची संधी; पद-पैसा वृद्धी, शुभ होईल!
12
बॉम्बच्या धमकीमुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, पॅरिसहून येणाऱ्या विमानात मिळाली चिठ्ठी
13
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे तिहार तुरुंगात आत्मसमर्पण
14
जोकोविचला पाच सेटपर्यंत करावा लागला संघर्ष, रॉजर फेडररच्या विक्रमाशी केली बरोबरी
15
अभिनेत्री रवीना टंडनसह ड्रायव्हरला संतप्त जमावाची मारहाण
16
उद्योगपती गौतम अदानी भारतात सर्वात श्रीमंत, जगात सर्वाधिक श्रीमंतांकडे किती संपत्ती? 
17
नव्या उच्चांकासाठी बाजार सज्ज, एक्झिट पोलमधून देशात स्थिर सरकारचे येण्याचे संकेत
18
अनिल परब आज उमेदवारी अर्ज दाखल करणार
19
प्रवासकोंडीचे ग्रहण सुटले, मध्य रेल्वेवर जम्बो ब्लॉकला पूर्णविराम
20
एआय एक्झिट पोलमध्येही 'कमळ'; पण इंडियाच्याही जागा वाढणार

खेलो इंडिया : खो-खो मध्ये महाराष्ट्राची धडाकेबाज घोडदौड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 11:26 PM

बास्केटबॉलमध्ये विजयी सलामी

गुवाहटी : खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या तिस-या पर्वात खो-खो मध्ये महाराष्ट्राने १७ वर्षाखालील मुली व मुले तसेच २१ वर्षाखालील मुले व मुलींमध्ये लागोपाठ दुसरा विजय नोंदवित धडाकेबाज घोडदौड कायम राखली.      

 

मुलींच्या १७ वर्षाखालील गटात महाराष्ट्राने आसामचा १८-५ असा एक डाव १३ गुणांनी धुव्वा उडविला. त्याचे श्रेय ऋतुजा खरे (५ गडी व नाबाद ३ मिनिटे), रेश्मा राठोड (३ मिनिटे ४० सेकंद) व अपेक्षा सुतार (नाबाद ३ मिनिटे) यांच्या खेळास द्याावे लागेल. मुलांच्या १७ वर्षाखालील गटात महाराष्ट्राने गुजरातला २०-११ असे दणदणीत पराभूत केले. त्या वेळी महाराष्ट्राकडून सौरभ अहिर (दीड मिनिटे व ४ गडी), सिद्धेश थोरात (२ मिनिटे व नाबाद १ मिनिट), रोहन कोरे (अडीच मिनिटे) यांनी महत्त्वाचा वाटा उचलला. गुजरातच्या विशाल तडवी (एक मिनिट ५० सेकंद व एक मिनिट १० सेकंद) याची लढत एकाकी ठरली.

    मुलींच्या २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्राने हरियाणाचा १५-५ असा एक डाव १० गुणांनी धुव्वा उडविला. महाराष्ट्राच्या प्रांजल मडकर (साडेचार मिनिटे व २ मिनिटे १० सेकंद), श्रेया पाटील (साडेतीन मिनिटे व २ गडी) व प्रीति काळे (नाबाद साडेतीन मिनिटे) यांनी उल्लेखनीय खेळ केला. मुलांच्या २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्राने आसाम संघास १७-११ असे निष्प्रभ केले. त्यांच्याकडून प्रवीण मगर (२ मिनिटे व एक मिनिट ५० सेकंद), अरुण गुणकी (५ गडी) व आदर्श मोहिते (२ गडी व अडीच मिनिटे) यांनी सिंहाचा वाटा उचलला.* हॉकीत उत्तरप्रदेशची महाराष्ट्रावर मात    मुलींच्या २१ वर्षाखालील गटात उत्कंठापूर्ण लढतीत ५१ व्या मिनिटाला अंशिका सिंग हिने केलेल्या गोलामुळेच उत्तरप्रदेशने महाराष्ट्रावर ४-३ असा विजय मिळविला. विनम्रता यादवने तीन गोल करीत उत्तरप्रदेशच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. महाराष्ट्राकडून भावना खाडे (२१ वे मिनिट), ऋतुजा पिसाळ (३५ वे मिनिट) व वैष्णवी फाळके (४५ वे मिनिट) यांनी गोल केले. महाराष्ट्राने यापूर्वीच उपांत्य फेरी निश्चित केली आहे.    महाराष्ट्राला १७ वर्षाखालील मुलींच्या गटातही पराभव पत्करावा लागला. ओडिशाने त्यांचा ३-० असा पराभव केला. त्या वेळी ओडिशाकडून दीपामोनिका टोप्पो, अंशिका राऊत व ज्योती छेत्री यांनी प्रत्येकी एक गोल केला.*बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राची विजयी सलामी    महाराष्ट्राने मुलींच्या २१ वर्षाखालील गटात कर्नाटक संघाचा ८६-५८ असा पराभव करीत शानदार प्रारंभ केला. पूर्वार्धात त्यांनी ४२-१९ अशी आघाडी घेतली होती. त्यांच्याकडून सुझानी पिंटो हिने उल्लेखनीय खेळ केला.

टॅग्स :Khelo Indiaखेलो इंडियाKho-Khoखो-खोMaharashtraमहाराष्ट्र