शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

खेलो इंडिया 2019 : जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राचा सुवर्णचौकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2019 17:10 IST

Khelo India 2019: महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खेलो इंडिया 2019 मध्ये जिम्नॅस्टिक्समधील वर्चस्व कायम राखताना रविवारी तीन सुवर्णपदकांची कमाई केली.

पुणे : महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खेलो इंडिया 2019 मध्ये जिम्नॅस्टिक्समधील वर्चस्व कायम राखताना रविवारी तीन सुवर्णपदकांची कमाई केली. आदिती दांडेकरने दोन प्रकारात, तर रिचा चोरडिया व अरिक डे यांनी प्रत्येकी एक सुवर्णपदक मिळवत महाराष्ट्राच्या यशात महत्त्वाचा वाटा उचलला. जिम्नॅस्टिक्सच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्राने चार रौप्य व एक कांस्यपदकाची कमाई केली. मुलींच्या 21 वर्षांखालील क्लब्ज प्रकारात रिचाने 11.65 गुण नोंदवत सुवर्णपदक जिंकले. तिची सहकारी आदितीने 10.75 गुणांसह रौप्यपदक मिळवले, तर दिल्लीच्या मेहकप्रीत कौरने 10 गुणांसह कांस्यपदकाची कमाई केली. आदितीने रिबन्स प्रकारात सोनेरी कामगिरी करताना 12.15 गुणांची नोंद केली. तेलंगणाच्या जी.मेघना रेड्डीने 10.50 गुणांसह रौप्यपदक पटकावले. मेहकप्रीतला या प्रकारातही कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. आदितीने चेंडू प्रकारातही सुवर्णपदकांची नोंद केली तिने 12.65 गुण नोंदवले. जी.मेघना रेड्डी (त्रिपुरा) व किमया कदम (महाराष्ट्र) यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळवले. आदितीला हूप प्रकारात रौप्यपदक मिळाले. तिने 10.45 गुण मिळवले. मेघना रेड्डीने 11.05 गुणांसह सुवर्णपदक पटकावले.हॉरिझोन्टल बार या प्रकारात अरिकने सुवर्णपदक जिंकताना 12.25 गुण नोंदवले. त्याचा सहकारी ओंकार शिंदेने रौप्यपदक मिळवताना 11.40 गुणांची कमाई केली. दिल्लीच्या इसाक अन्वरने 11.15 गुणांसह कांस्यपदक पटकावले. समांतर बार प्रकारात अरिकला रौप्यपदक मिळाले. त्याने 12.30 गुण मिळवले. अग्निवेश पांडे (उत्तरप्रदेश) याने  12.45 गुणांसह सुवर्णपदक जिंकले. पंजाबच्या आर्यन शर्माने 11.25 गुणांसह कांस्यपदक मिळवले.  

टॅग्स :Khelo India 2019खेलो इंडिया 2019Khelo Indiaखेलो इंडियाMaharashtraमहाराष्ट्र