शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या धमक्यांना इंडियन ऑईल घाबरली, रशियाकडून तेल खरेदी केली बंद; रिलायन्स मात्र...
2
Anil Ambani ED: अनिल अंबानींना ED नं चौकशीसाठी बोलावलं, १७ हजार कोटींच्या लोन फ्रॉड केसमध्ये टाकलेले छापे
3
एकमेकांना शेवटचं बघताच आलं नाही! अल्जेरियात मुलाचा मृत्यू, मृतदेहाची वाट पाहणाऱ्या वडिलांचेही निधन 
4
माजी आमदाराची मुलगी अन् पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीचा रहस्यमय अंत; मृत्यूपूर्वीचा Video आला, मग...
5
Stock Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; Sensex १७० अंकांची घसरण, FMCG Stocks मध्ये मोठी खरेदी
6
ऑनलाईन गेममध्ये पैसे जिंकले, पार्टीसाठी बाहेर पडले अन्...; ५ तरुणांसोबत घडलं आक्रित
7
"तिने आमचं घर तोडलं असं लोक म्हणाले, पण...", RJ महावशसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलला युजवेंद्र चहल
8
Yuzvendra Chahal : "आयुष्याला कंटाळलो, २ तास रडायचो, आत्महत्येचे विचार..."; युजवेंद्र चहलने घटस्फोटावर सोडलं मौन
9
धुळ्याची लेक मृणाल ठाकूरचा पहिलाच मराठी सिनेमा, 'या' अभिनेत्यासोबत केलेला रोमान्स
10
पती पत्नीसाठी बेस्ट आहे Post Office ची 'ही' स्कीम; ५ वर्षांत जमवू शकता १३ लाख रुपये, जाणून घ्या
11
नवऱ्याला सोडून पुतण्यासोबत लग्न, आता पुन्हा गावात येऊन पहिल्या पतीला दिलं थेट आव्हान! म्हणाली...
12
भारताविरोधात एवढी कारस्थाने रचून ट्रम्पना अजूनही आशा; सही केली पण टेरिफ ७ दिवस टाळले
13
खुर्चीवरुन कोसळला अन्...; ३० वर्षीय डिलिव्हरी बॉयचा हार्ट अटॅकने मृत्यू, २ मुली झाल्या पोरक्या
14
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
15
मृत मुलाला जिवंत करण्यासाठी आईची धडपड; कधी CPR तर कधी ऑक्सिजन दिला, हृदयद्रावक Video व्हायरल
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा २५% टॅरिफचा निर्णय लांबणीवर, काय असणार आता नवी तारीख?
17
५ महिन्याच्या गर्भवतीचे हात-पाय तोडले; दारूच्या नशेत पतीने बेदम मारले, पत्नीची निर्दयी हत्या
18
गॅस सिलिंडर ३४.५० रुपयांनी स्वस्त झाला; १ ऑगस्टपासून हे महत्वाचे चार बदल, पाचवा...
19
आजचे राशीभविष्य १ ऑगस्ट २०२५ : भटकंती कराल, अचानक धनलाभ होईल! असा जाईल आजचा दिवस
20
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका

खेलो इंडिया 2020 : जिम्नॅस्टिक्समध्ये अस्मी व मानसचे पदार्पणातच सोनेरी यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 19:15 IST

व्हॉलिबॉलमध्ये महाराष्ट्राच्या मुली पराभूत

खेलो इंडिया युथ गेम्सच्या तिस-या पर्वात महाराष्ट्राच्या अस्मी बडदे हिने रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये तर मानस मनकवले याने पॉमेल हॉर्स प्रकारात पदार्पणातच सोनेरी कामगिरी करीत स्वप्नवत यश संपादन केले. महाराष्ट्राच्या श्रेया बंगाळे व सिद्धी हात्तेकर यांनी रुपेरी यश मिळवित महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व राखले. महाराष्ट्राच्याच मेघ रॉय व सलोनी दादरकर यांनीही ब्राँझपदकावर आपले नाव कोरले.

चुरशीने झालेल्या सर्वसाधारण विभागात १७ वर्षाखालील गटात अस्मीने ४३.८० गुणांची कमाई केली तर श्रेयाला ४०.८० गुण मिळाले. या दोन्ही खेळाडूंनी चेंडू व दोरीच्या साहाय्याने अप्रतिम कसरती सादर केल्या. या कसरती करताना त्यांनी उत्तम प्रकारे तोलही सांभाळला. अस्मी ही प्रथमच खेलो इंडिया स्पधेर्साठी पात्र ठरली होती. तिने यापूर्वी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये ५ सुवर्ण व एक रौप्यपदकाचा मान मिळविला आहे. श्रेयाने गतवर्षी या स्पर्धेसह राष्ट्रीय स्तरावर पदकांची लयलूट केली आहे.

अस्मी व श्रेया या दोन्ही खेळाडू ठाणे येथे पूजा व मानसी सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. अस्मी ही १४ वर्षीय खेळाडू ठाणे येथील ज्ञानसाधना विद्याामंदिर प्रशालेत शिकत आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी पदके मिळविण्याचे तिचे ध्येय आहे. याच क्रीडा प्रकारात आसामच्या उपासा तालुकदारने ३४.२५ गुणांसह ब्राँझपदक पटकाविले.

सिद्धी हात्तेकरला रौप्यपदकमहाराष्ट्राच्या सिद्धी हत्तेकरने १७ वर्षांखालील गटात खेळताना आपल्या नावावर आणखी एका पदकाची नोंद केली. तिने टेबल व्हॉल्ट प्रकारात रौप्यपदक मिळविले. पहिल्या दिवशी तिने सर्वसाधारण प्रकारात रौप्यपदक पटकाविले होते. ती औरंगाबाद येथील खेळाडू असूल तिला रामकृष्ण लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. 

मानस मनकवलेला सुवर्णपदक१७ वर्षांखालील गटात महाराष्ट्राच्या मानस मनकवले याने मुलांच्या पॉमेल हॉर्स प्रकारात सुवर्णपदक जिंकताना स्वप्नवत कामगिरी केली. या प्रकारात त्याने सुरेख लवचिकता दाखविताना अप्रतिम कसरती केल्या. तो ठाणे येथे सरस्वती क्रीडा संकुलात जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रात महेंद्र बाभुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. १४ वर्षीय मानसची ही पहिलीच खेलो इंडिया स्पर्धा आहे. त्याला १०.६५ गुण मिळाले. त्याने यापूर्वी राज्य व राष्ट्रीय स्तरावर भरपूर पदके मिळविली आहेत. तर, १७ वर्षाखालील गटात मेघ रॉय याने फ्लोअर एक्झरसाईजमध्ये ब्राँझपदक पटकाविले. मुलींच्या असमांतर बार्समध्ये सलोनीला ब्राँझपदक मिळाले. इशिता रेवाळे हिने १७ वर्षाखालील गटातच बॅलन्सिंग बीम प्रकारात ब्रॉंझ पदक जिंकले. 

 

व्हॉलिबॉलमध्ये महाराष्ट्राच्या मुली पराभूतव्हॉलिबॉलमध्ये महाराष्ट्राला २१ वर्षाखालील मुलींच्या गटात पहिलाच पराभव स्विकारावा लागला. केरळने त्यांचा २५-२१, २५-१३, २५-८ असा तीन सेटमध्ये पराभव केला. केरळच्या मुलींनी जोरदार स्मॅशिंग व भक्कम बचाव याचा सुरेख सन्मवय ठेवीत महाराष्ट्राच्या खेळाडूंना फारशी संधी दिली नाही. पहिल्या सेटपासूनच केरळने आपला दबदबा निर्माण केला होता. पहिल्या सेटमध्ये महाष्ट्राने त्यांना लढत दिली. तथापी, नंतरच्या दोन सेटमध्ये महाराष्ट्राचा बचाव नि:ष्प्रभ ठरला.

टॅग्स :Khelo Indiaखेलो इंडियाMaharashtraमहाराष्ट्र