शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Khel Ratna award : तब्बल अकरा खेळाडू ठरणार ‘खेलरत्न’; नीरज, मिताली, छेत्री यांची शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 07:49 IST

Khel Ratna award : मागच्यावर्षी पाच खेळाडूंना तर २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकनंतर चार खेळाडूंना खेलरत्न पुरस्कार देण्यात आला होता.

नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्ण विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा, रौप्य विजेता मल्ल रवी दहिया आणि कांस्य विजेती बॉक्सर लवलीना बोरगोहेन यांच्यासह प्रथमच ११ जणांच्या नावाची बुधवारी ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न’ या सर्वोच्च क्रीडा पुरस्कारासाठी  घोषणा करण्यात आली. खेलरत्नसाठी सहभागी अन्य खेळाडूंमध्ये अनुभवी हॉकी गोलकीपर पीआर श्रीजेश आणि महिला कसोटी क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज, फुटबॉल संघाचा दिग्गज खेळाडू सुनील छेत्री यांच्या नावाचा समावेश आहे.

मागच्यावर्षी पाच खेळाडूंना तर २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकनंतर चार खेळाडूंना खेलरत्न पुरस्कार देण्यात आला होता. टोकियो पॅरॉलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंची कामगिरी विचारात घेण्यासाठी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यास उशीर झाला. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकणारे अवनी लेखरा आणि मनीष नरवाल, भालाफेकपटू सुमित अंतील आणि बॅडमिंटनपटू प्रमोद भगत तसेच कृष्णा नागर यांना देखील खेलरत्न देण्यात येणार आहे.

समितीने अर्जुन पुरस्कारासाठी एकूण ३५ जणांची नावे जाहीर झाली असून  मागच्यावर्षी ही संख्या २७ होती. यंदा शिफारस झालेल्यांमध्ये क्रिकेटपटू शिखर धवन, पॅरा टेबल टेनिसपटू भाविना पटेल, पॅराबॅडमिंटनपटू सुहास यथिराज आणि उंच उडीतील खेळाडू निषाद कुमार आदींचा समावेश आहे. ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कांस्य जिंकणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघातील सर्वच खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले जाईल.

छेत्री ठरणार विशेष फुटबॉल स्टार आणि भारताचा कर्णधार सुनील छेत्री याचा होणारा सन्मान ऐतिहासिक ठरणार आहे. आता पर्यंत कधीही खेलरत्न पुरस्कारासाठी फुटबॉलपटूची शिफारस झालेली नाही. त्यामुळे छेत्रीचा होणारा गौरव भारतीय फुटबॉलसाठे अत्यंत अभिमानास्पद ठरेल.

टॅग्स :Neeraj Chopraनीरज चोप्रा