काटोलचा दिलराजसिंग भारतीय खो-खो संघात

By Admin | Updated: January 31, 2017 02:06 IST2017-01-31T02:06:16+5:302017-01-31T02:06:16+5:30

नागपूर : काटोलच्या विदर्भ क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचा दिलराजसिंग सेंगर याने भारतीय खो-खो संघात स्थान पटकावले आहे. अजमेर येथे ३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी त्याची संघात निवड करण्यात आली.

Katol's Dilraj Singh in the Indian Kho-Kho team | काटोलचा दिलराजसिंग भारतीय खो-खो संघात

काटोलचा दिलराजसिंग भारतीय खो-खो संघात

गपूर : काटोलच्या विदर्भ क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचा दिलराजसिंग सेंगर याने भारतीय खो-खो संघात स्थान पटकावले आहे. अजमेर येथे ३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी त्याची संघात निवड करण्यात आली.
भारतीय संघात निवड झालेला तो एकमेव वैदर्भीय असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रा. सुनील सोनारे यांनी दिली. दिलराजसिंग याने याआधी गाझियाबादच्या सब-ज्युनियर राष्ट्रीय तसेच भिलाई, गुडगाव, इंदूर व सोलन येथे झालेल्या ज्युनियर राष्ट्रीय आणि सोलापूर व नागपुरात झालेल्या सिनियर गटाच्या राष्ट्रीय स्पर्धा गाजविल्या आहेत. २०१६ च्या सॅफ गेम्स आणि आशियाई खो-खो स्पर्धेसाठी संभाव्य भारतीय संघात त्याची निवड झाली होती. विदर्भ संघटनेचे सचिव रामदास दरणे, जिल्हा संघटनेचे सचिव प्रा. सुधीर निंबाळकर यांचे त्याला मार्गदर्शन मिळाले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Katol's Dilraj Singh in the Indian Kho-Kho team