करुण नायरला कसोटी संघात पुनरागमनाचे वेध

By Admin | Updated: July 12, 2017 00:38 IST2017-07-12T00:38:44+5:302017-07-12T00:38:44+5:30

विक्रमी त्रिशतकी खेळी करणाऱ्या करुण नायरला कसोटी संघाचे वेध लागले आहेत.

Karun Nair's return to Test squad | करुण नायरला कसोटी संघात पुनरागमनाचे वेध

करुण नायरला कसोटी संघात पुनरागमनाचे वेध

नवी दिल्ली : विक्रमी त्रिशतकी खेळी करणाऱ्या करुण नायरला कसोटी संघाचे वेध लागले आहेत. या महिन्याअखेरीस भारतीय ‘अ’ संघासोबत द. आफ्रिका दौऱ्यावर जात असून चांगली कामगिरी करीत तो राष्ट्रीय संघात परतू इच्छितो.
नायरला श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले नाही. त्याच्या जागी रोहित शर्माची निवड झाली. इंग्लंडविरुद्ध ३०३ धावा ठोकल्यापासून नायरने केवळ चारच डाव खेळले. तो म्हणाला, ‘निवड समिती आणि संघव्यवस्थापनाचा निर्णय सर्वतोपरी आहे. सध्या भारतीय अ संघाच्या द. आफ्रिका दौऱ्याकडे लक्ष केंद्रित केले असून माझ्यासाठी हा नवा अनुभव असेल. याआधी द. आफ्रिकेला गेलो नसल्याने तेथील परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी कठोर सराव करीत आहे. २५ वर्षांच्या करुणने आतापर्यंत सहा कसोटी सामन्यांतील सात डावांमध्ये ३७४ धावा केल्या.(वृत्तसंस्था)

Web Title: Karun Nair's return to Test squad