कर्नाटक-तमिळनाडूत आजपासून फायनल
By admin | Updated: March 8, 2015 00:31 IST
रणजी करंडक : अंतिम सामना चुरशीचा ठरणार
कर्नाटक-तमिळनाडूत आजपासून फायनल
रणजी करंडक : अंतिम सामना चुरशीचा ठरणारमुंबई : विजेतेपद कायम ठेवण्याच्या प्रयत्नात असलेला गत चॅम्पियन कर्नाटक उद्यापासून येथे वानखेडे स्टेडियमवर होणार्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत तमिळनाडूचे कडवे आव्हान पेलण्यास सज्ज आहे.दक्षिण विभागाच्या दोन्ही संघांत देशाचे प्रतिनिधित्व केलेल्या खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे ही लढत रोमहर्षक ठरण्याची चिन्हे आहेत. १९७३-७४मध्ये प्रथम रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद जिंकणार्या कर्नाटकाने गतवर्षी आपले सातवे अजिंक्यपद पटकावले होते, तर तुलनेत आतापर्यंत फक्त दोनदाच चॅम्पियनचा बहुमान मिळवणार्या तमिळनाडूने याआधी १९८७-८८मध्ये हे विजेतेपद आपल्या नावावर केले होते.गत चॅम्पियन कर्नाटक दोन वर्षांपासून अजेय आहे आणि उद्यापासून सुरू होणार्या अंतिम सामन्यात हा संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून मैदानात पाऊल ठेवेल. या संघाने याआधी पहिल्या सत्रातील पहिल्या सामन्यातदेखील तमिळनाडूचा २८५ धावांनी पराभव केला होता आणि या हंगामातील तमिळनाडूचा हा एकमेव पराभव ठरला होता.कर्नाटकाच्या फलंदाजीच्या फळीला चांगला सूर गवसला आहे. रॉबिन उथप्पाने या हंगामात ९१२ धावा केल्या असून, या संघात तो अव्वल स्थानी आहे. श्रेयस गोपाल, रविकुमार सर्म आणि के. एल. राहुल यांनीदेखील ६०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.कर्नाटकासाठी एकमेव चिंतेची बाब ही सी. ए. गौतम याचा फिटनेस आहे. तो स्नायूदुखीने त्रस्त आहे.गोलंदाजीत कर्नाटकाची मदार ही कर्णधार आर. विनयकुमार, अभिमन्यू मिथुन आणि डावखुरा वेगवान गोलंदाज श्रीनाथ अरविंद यांच्यावर असेल. या तिघांनी ११६ पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत.दुसरीकडे, तमिळनाडूच्या अव्वल सहा फलंदाजांत भारताचा कसोटीतील सलामीवीर मुरली विजय, अभिनव मुकुंद, दिनेश कार्तिक, विजय शंकर आणि जुळे बंधू बाबा अपराजित व बाबा इंद्रजित यांचा समावेश आहे. त्यामुळे उद्यापासून बॅट आणि चेंडूंत रोमाचंक लढत पाहायला मिळेल.कर्णधार मुकुंदने तमिळनाडूकडून सर्वाधिक ८१० धावा केल्या आहेत. कार्तिकने ७,३५३ आणि इंद्रजितने ६६८ धावा केल्या आहेत. गोलंदाजीत तमिळनाडूकडून ऑफस्पिनर मालोलन रंगराजनने ३३, तर डावखुरा फिरकी गोलंदाज राहिल शाहने २७ गडी बाद केले. याआधी तमिळनाडूने २०११-१२मध्ये अंतिम फेरीत धडक मारली होती; परंतु तेव्हा त्यांना राजस्थानकडून पराभव पत्करावा लागला. (वृत्तसंस्था)०००