शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Ola,Uber आणि Rapido कंपन्यांना झटका!' या' राज्यात तीन दिवसात सेवा बंद करण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 17:30 IST

अॅपद्वारे चालणाऱ्या कॅब कंपन्यांना कर्नाटक सरकारने मोठा झटका दिला आहे. ओला, उबेर, आणि रॅपिडो या कंपन्यांना तीन दिवसात कर्नाटक राज्यातील ऑटो सेवा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अॅपद्वारे चालणाऱ्या कॅब कंपन्यांना कर्नाटक सरकारने मोठा झटका दिला आहे. ओला, उबेर, आणि रॅपिडो या कंपन्यांना तीन दिवसात कर्नाटक राज्यातील ऑटो सेवा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कंपन्यांना बेकायदेशीर ठरवत राज्य सरकारने आदेश काढला आहे. 

कर्नाटक सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर तीनही कंपन्यांना नोटीस पाठवली आहे. पुढच्या तीन दिवसात तुमच्या कंपनीची ऑटो सेवा बंद करण्याचे आदेश यात दिले आहेत. या कंपन्यांविरोधात अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या होत्या, यावर आता राज्य सरकारने कारवाई केली आहे. 

देशात 2026 पासून धावणार पहिली बुलेट ट्रेन, रेल्वेमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

या तिनही कंपन्या ऑटो २ किलोमीटरच्या अंतरावर गेल्यानंतर १०० रुपये भाडे आकारतात, याअगोदर या कंपन्या नव्हत्या त्यावेळी २ किलोमीटरसाठी २० ते ३० रुपये भाडे आकारले जात होते. अशा तक्रारी अनेक ग्राहकांनी राज्य सरकारकडे केल्या होत्या. या तक्रारीवरुन राज्य सरकारने कारवाई केली आहे.

राज्यात या कंपन्यांनी सेवा सुरू केल्यानंतर ऑटो रिक्षाचे भाडे वाढले असल्याच तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीनंतर कर्नाटक सरकारने गुरुवारी राज्य सरकारने कॅप कंपन्यांना नोटीस पाठवली आहे. जर रिक्षा चालकांनी सरकारच्या आदेशाचे उल्लंघन केले तर त्यांना दंड ठोठावला जाईल, असंही या नोटीसमध्ये म्हटले आहे. 

काँग्रेसच्या दोन आमदारांवर दारू पिऊन ट्रेनमध्ये महिला प्रवाशाचा विनयभंग केल्याचा आरोप, एफआयआर दाखल

या कंपन्या केवळ नियमानुसार ऑटो-रिक्षा चालविण्यास पात्र नाहीत. याचे नियम फक्त टॅक्सींसाठी आहेत. या कॅब कंपन्या सरकारी मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून राज्यात ऑटो सेवा पुरवत असून ग्राहकांकडून मनमानी पद्धतीने निर्धारित दरापेक्षा जास्त शुल्क आकारले जात आहे, असं वाहतुक पोलिसांनी दिलेल्या अहवालात म्हटले आहे.

टॅग्स :OlaओलाUberउबर