Kabaddi: Sharadashram Vs. DeSouza School The final fight will play | कबड्डी : शारदाश्रम वि. डिसोझा स्कूलमध्ये अंतिम लढत
कबड्डी : शारदाश्रम वि. डिसोझा स्कूलमध्ये अंतिम लढत

  मयूर सातपे व दत्तगुरू नेरुरकर यांच्या अप्रतिम खेळामुळे शारदाश्रम विद्या मंदिर मुलांचे माध्यमिक विद्यालय संघाने श्री हशू अडवाणी मेमोरियल स्कूलचा २७ गुणांनी पराभव केला आणि आत्माराम मोरे प्रतिष्ठान व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित भारतीय आयुर्विमा महामंडळ पुरस्कृत बालक दिनानिमित्तच्या आंतर शालेय मुंबई सुपर लीग कबड्डी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. शारदाश्रम विद्या मंदिर मुलांचे माध्यमिक विद्यालय-दादर  विरुद्ध डॉ. अँटोनियो डिसोझा हायस्कूल-भायखळा यामध्ये अंतिम लढत होणार आहे.  

    अमर हिंद मंडळ, नगरसेवक महादेव शिवगण व बीपीसीए यांच्या सहकार्याने सुरु असलेल्या शालेय कबड्डी स्पर्धेमधील उपांत्य फेरीत शारदाश्रम विद्या मंदिर माध्यमिक विद्यालयाने अडवाणी स्कूलविरुद्ध प्रथमपासूनच आक्रमक खेळ केला. मयूर सातपे व दत्तगुरू नेरुरकर यांच्या सर्वांगसुंदर खेळामुळे शारदाश्रम विद्या मंदिर माध्यमिक विद्यालयाने अडवाणी स्कूलवर तीन लोण चढवून ५४-२७ असा विजय प्राप्त केला. अडवाणी स्कूलतर्फे यश हूदले व सोहम हातणकर यांनी छान खेळ केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात डॉ. अँटोनियो डिसोझा हायस्कूलने तब्बल चार लोण मारून शारदाश्रम टेक्निकल हायस्कूलचा ५९-२३ असा पराभव करतांना चढाईपटू प्रथम लाड व बचावपटू रोहन शिंदे यांनी विजयी खेळ केला.

Web Title: Kabaddi: Sharadashram Vs. DeSouza School The final fight will play

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.