Kabaddi: Om Sai Sports Board in second round | कबड्डी : ओम साई क्रीडा मंडळ दुसऱ्या फेरीत

कबड्डी : ओम साई क्रीडा मंडळ दुसऱ्या फेरीत

शरद आचार्य प्रतिष्ठान, लालबत्ती कला क्रीडा मंडळ, ओम साई क्रीडा मंडळ, चेतना क्रीडा मंडळ यांनी मुंबई उपनगर कबड्डी असो. आयोजित “जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या” व्दितीय श्रेणी गटात दुसरी फेरी गाठली. कृष्णा बोराटने आपल्या एकाच चढाईत ६ गडी बाद केले खरे, पण संघाचा पराभव टाळण्यास तो अपयशी ठरला.  या गटात १६४ संघनी आपला सहभाग नोंदविला आहे. म्हणजे १६३ सामने ह्या गटात होतील. 

   नेहरू नगर – कुर्ला येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर सुरू असलेल्या या स्पर्धेतील व्दितीय श्रेणीच्या सामन्यात शरद आचार्य प्रतिष्ठानने प्रशांत क्रीडा मंडळाला २३-२२असे चकवीत आगेकूच केली. रोहित शिगवण, सोहल सकपाळ यांनी सुरुवातीपासून आक्रमक खेळ करीत शरद आचार्य प्रतिष्ठानला विश्रांतीलाच १२-०५ अशी समाधानकारक आघाडी मिळवून दिली होती. पण उत्तरार्धात त्यांच्यापुढे  काय वाढून ठेवले होते? याची त्यांना कल्पना नव्हती. उत्तरार्धात प्रशांत मंडळाच्या कृष्णा बोराटेला चांगलाच सूर सापडला. त्याने आपल्या एकाच चढाईत ६गडी टिपत सामन्यात चांगलीच चुरस निर्माण केली. पण या खेळाचा संघाच्या विजयात रूपांतर करणे त्याला जमले नाही. त्यातच अन्य सहकाऱ्याकडून त्याला म्हणावी तशी साथ लाभली नाही. लालबत्ती कला क्रीडा मंडळाने मध्यांतरातील ०८-१० अशा पिछाडीवरून साई सेवा क्रीडा मंडळावर २६-१५ अशी मात केली. ही विजयी किमया साधली ती अनिकेत चव्हाण, आदेश गटणे यांच्या चढाई- पकडीच्या चतुरस्त्र खेळाने. सौरभ शिंदे, प्रेमकुमार लक्कू यांच्या खेळाने साईने सुरुवातीला आघाडी घेण्यात यश मिळविले होते. पण तोच जोश त्यांना शेवटपर्यंत राखता आला आला नाही. त्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.ओम साई क्रीडा मंडळाने भरारी स्पोर्ट्स क्लबला १७-०७ असे नमविलें. तुषार जाधव, दिनेश बिले ओम साईकडून, तर कैलास गावडे भरारी स्पोर्ट्सकडून उत्तम खेळले. कुणाल परमार, तुषार लागकर यांच्या सर्वांगसुंदर खेळाच्या बळावर चेतना क्रीडा मंडळाने त्रिमूर्ती स्पोर्ट्सचा ३०-१६ असा सहज पराभव केला. आकाश गायकवाड, सुमंत चौगुले त्रिमूर्तीकडून बरे खेळले.

  इतर निकाल संक्षिप्त :-  कुमारी गट – दुसरी फेरी १) महात्मा फुले वि वि स्वस्तिक क्रीडा मंडळ २३-१०; 

 कुमार गट पहिली फेरी :- १)लायन कबड्डी संघ वि वि राजमाऊली क्रीडा मंडळ ३७-१३; २)श्री शंभूराजे क्रीडा मंडळ वि वि निर्विघ्न स्पोर्ट्स क्लब २१-१८; ३)टागोरनगर मित्र मंडळ वि वि सिद्धिविनायक स्पोर्ट्स २४-१८; ४) स्वराज्य स्पोर्ट्स वि वि बालवीर स्पोर्ट्स १४-११; ५) स्वामी समर्थ स्पोर्ट्स वि वि मुलुंड क्रीडा केंद्र २७-२

Web Title: Kabaddi: Om Sai Sports Board in second round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.