शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय शिलेदारांचा पुन्हा एकदा 'सोन्यावर' निशाणा; त्रिकुटानं पॅरिसमध्ये जिंकलं 'गोल्ड'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2023 14:16 IST

World Cup Stage 4 in Paris : तिरंदाजी विश्वचषक स्टेज ४ कम्पाऊंड महिला सांघिक स्पर्धेत भारताने सुवर्णपदक जिंकले. 

नवी दिल्ली : अलीकडेच पार पडलेल्या जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या महिला शिलेदारांनी ऐतिहासिक कामगिरी केली. हाच विजयरथ कायम ठेवत आता भारताच्या महिला खेळाडूंनी तिरंदाजी स्पर्धेत पुन्हा एकदा सुवर्ण पदक पटकावले आहे. खरं तर पॅरिसमध्ये तिरंदाजी विश्वचषक स्टेज ४ कम्पाऊंड महिला सांघिक स्पर्धेत भारताने सुवर्णपदक जिंकले. ज्योती, अदिती आणि परनीत या त्रिकुटाने अंतिम फेरीत WR १ मेक्सिकोचा २३४-२३३ असा पराभव करून विजयावर शिक्कामोर्तब केला. 

दरम्यान, याच त्रिकुटाने काही आठवड्यांपूर्वी त्याच मेक्सिकन संघाला हरवून जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले होते. ज्योती सुरेखा वेन्नम, अदिती स्वामी आणि परनीत कौर यांनी जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताला प्रथमच सुवर्णपदक जिंकून दिले. त्यांनी महिला कम्पाऊंड सांघिक गटाच्या अंतिम सामन्यात मेक्सिकोवर २३५-२२९ असा विजय मिळवला होता.

सातारच्या लेकीची 'गरूडझेप' सुवर्ण पदकाला गवसणी घालणारी अदिती स्वामी ही सातारा जिल्ह्यातील आहे. पहिले जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत सांघिक सुवर्ण आणि नंतर वैयक्तिक सुवर्ण जिंकून तिने ऐतिहासिक कामगिरी केली. अशातच आता अदितीने तिच्या सहकारी खेळाडूंसोबत तिरंदाजी विश्वचषक स्टेज ४ कम्पाऊंडमध्ये सुवर्ण पदकाला गवसणी घातली. लक्षणीय बाब म्हणजे जागतिक तिरंदाजी स्पर्धेच्या अंतिम फेरीत मेक्सिकोच्या अँड्रिया बेसेरा हिला १४९-१४७ ने पराभूत करून कंपाऊंड तिरंदाजीमध्ये अदितीने विश्वविजेतेपद मिळवले होते. १७ वर्षांची अदिती गोपीचंद स्वामी ही भारताची पहिली विश्वविजेती ठरली आहे. 

टॅग्स :Gold medalसुवर्ण पदकIndiaभारतParisपॅरिसsatara-pcसातारा