शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

Paralympic 2020 : भारतानं जिंकलेलं पदक गमावलं, विनोद कुमार यांच्याकडून कांस्यपदक काढून घेतलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 15:32 IST

Paralympic 2020 : टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी सोमवारचा दिवस गाजवला. भारतीय खेळाडूंनी आज चार पदकांची कमाई केली.

Paralympic 2020 : टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी सोमवारचा दिवस गाजवला. भारतीय खेळाडूंनी आज चार पदकांची कमाई केली. नेमबाज अवनी लेखरा हिनं सुवर्णपदकाची कमाई करून इतिहास घडवला, तर गोळाफेकीत योगेश काथूनिया व भालाफेकीत देवेंद्र झाझरिया यांनी रौप्यपदक जिंकले. भालाफेकीत सुंदर सिंग गुर्जर यानं कांस्यपदक पटकावले. त्यामुळे भारताची पदकसंख्या ७ अशी झाली आहे. खरं तर ही ८ अशी झाली असती, परंतु थाळीफेकपटू विनोद कुमार यांचे पदक काढून घेण्यात आले आहे. रविवारी विनोद कुमार यांनी थाळीफेकीत F52 गटात कांस्यपदक जिंकले होते, परंतु या कॅटगरीसाठीच्या नियमात ते मोडत नसल्याचा आक्षेप प्रतिस्पर्धींनी नोंदवला. तपासाअंती त्यांच्याकडून हे पदक काढून घेण्याचा निर्णय आयोजन समितीनं घेतला. ( Vinod Kumar has lost his bronze medal in the Men's discus throw F52 after being unable to allocate him a competing category after review. His performance in the competition has been declared void.  रविवारी विनोद कुमार यांचे कांस्यपदक रोखून ठेवण्यात आले होते. बीएसएफमध्ये जवान असलेल्या विनोक कुमार यांनी १९.९१ मीटर लांब थाळी फेकली आणि आशियाई विक्रम करत कांस्यपदक जिंकले. या प्रकारात पोलंडच्या पियोट्र कोसेविजने सुवर्ण तर क्रोएशियाच्या वेलिमीर सॅडोरने रौप्यपद जिंकले. स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर काही देशांनी विनोद कुमार यांच्या पात्रतेला विरोध केला आणि आक्षेप नोंदवला.  

टॅग्स :Paralympic Gamesपॅरालिम्पिक स्पर्धाTeam Indiaभारतीय क्रिकेट संघ