Paralympic 2020 : भारतानं जिंकलेलं पदक गमावलं, विनोद कुमार यांच्याकडून कांस्यपदक काढून घेतलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 03:32 PM2021-08-30T15:32:00+5:302021-08-30T15:32:22+5:30

Paralympic 2020 : टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी सोमवारचा दिवस गाजवला. भारतीय खेळाडूंनी आज चार पदकांची कमाई केली.

Just In: India's Vinod Kumar loses men's F52 discus throw #Bronze after being found ineligible in disability classification assessment | Paralympic 2020 : भारतानं जिंकलेलं पदक गमावलं, विनोद कुमार यांच्याकडून कांस्यपदक काढून घेतलं

Paralympic 2020 : भारतानं जिंकलेलं पदक गमावलं, विनोद कुमार यांच्याकडून कांस्यपदक काढून घेतलं

Next

Paralympic 2020 : टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी सोमवारचा दिवस गाजवला. भारतीय खेळाडूंनी आज चार पदकांची कमाई केली. नेमबाज अवनी लेखरा हिनं सुवर्णपदकाची कमाई करून इतिहास घडवला, तर गोळाफेकीत योगेश काथूनिया व भालाफेकीत देवेंद्र झाझरिया यांनी रौप्यपदक जिंकले. भालाफेकीत सुंदर सिंग गुर्जर यानं कांस्यपदक पटकावले. त्यामुळे भारताची पदकसंख्या ७ अशी झाली आहे. खरं तर ही ८ अशी झाली असती, परंतु थाळीफेकपटू विनोद कुमार यांचे पदक काढून घेण्यात आले आहे. रविवारी विनोद कुमार यांनी थाळीफेकीत F52 गटात कांस्यपदक जिंकले होते, परंतु या कॅटगरीसाठीच्या नियमात ते मोडत नसल्याचा आक्षेप प्रतिस्पर्धींनी नोंदवला. तपासाअंती त्यांच्याकडून हे पदक काढून घेण्याचा निर्णय आयोजन समितीनं घेतला. ( Vinod Kumar has lost his bronze medal in the Men's discus throw F52 after being unable to allocate him a competing category after review. His performance in the competition has been declared void. 


रविवारी विनोद कुमार यांचे कांस्यपदक रोखून ठेवण्यात आले होते. बीएसएफमध्ये जवान असलेल्या विनोक कुमार यांनी १९.९१ मीटर लांब थाळी फेकली आणि आशियाई विक्रम करत कांस्यपदक जिंकले. या प्रकारात पोलंडच्या पियोट्र कोसेविजने सुवर्ण तर क्रोएशियाच्या वेलिमीर सॅडोरने रौप्यपद जिंकले. स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर काही देशांनी विनोद कुमार यांच्या पात्रतेला विरोध केला आणि आक्षेप नोंदवला.  

Web Title: Just In: India's Vinod Kumar loses men's F52 discus throw #Bronze after being found ineligible in disability classification assessment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.