शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

खतरनाक! फक्त पाच सेकंदांमध्ये त्याने अडवले दोन गोल, व्हिडीओ झाला वायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 17:45 IST

ही थरारक गोष्ट तुम्हालाही पाहायला नक्कीच आवडेल.

मुंबई : आयुष्यामध्ये काही गोष्ट फक्त एकदाच पाहायला मिळतात, असं म्हटलं जातं. तशीच एक गोष्ट घडली आहे. या गोष्टीचा व्हिडीओ चांगलाच वायरल झाला असून आता जगभरात हा व्हिडीओ पाहिला जात आहे. गोष्ट पण तशीच. यापूर्वी पाहायला न मिळाली अशीच आहे. एका गोलकिपरने फक्त पाच सेकंदांमध्ये दोन गोल अडवल्याचे पाहायला मिळाले आहे. ही थरारक गोष्ट तुम्हालाही पाहायला नक्कीच आवडेल.

एखाद्या गोलपोस्टवर हल्ला चढवला जातो. गोलकिपर बचाव करतो. काही वेळेला बचाव केलेला चेंडू प्रतिस्पर्धी खेळाडूंकडेही जातो. पण फक्त पाच सेकंदांमध्ये दुसऱ्यांदाच त्याच गोलपोस्टवर हल्ला केल्याचे पाहिले जात नाही. डोळ्याची पापणी लवते न  लवतेच तर पाच सेकंद होऊनही जातात. पण याच पाच सेकंदांमध्ये दोनदा गोल करण्याचे प्रयत्न झाले आणि मुख्य म्हणजे त्या गोलकिपरने हे दोन्ही प्रयत्न हाणून पाडले.

आता हा जलदपणे अचूक कामगिरी करणारा गोलकिपर कोण आणि ही गोष्ट नेमक्या कोणत्या सामन्यामध्ये घडली, याची उत्सुकता तुम्हाला असेल. तर या चाणाक्ष गोलकिपरचे नाव आहे महमूद गदी. ही गोष्ट पाहायला मिळाली ती इजिप्तमधील एका प्रीमियर लीगमध्ये. पिरॅमिड्स आणि ईएनपीपीआई या दोन संघांमध्ये हा सामना रंगला होता. पण नेमके घडले काय आणि कसे, हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल.

ईएनपीपीआईच्या गोलपोस्टवर प्रतिस्पर्धी संघाने हल्ला चढवला होता. त्यावेळी चेंडू ईएनपीपीआईच्या भागामध्ये आला होता. प्रतिस्पर्धी खेळाडूने हा चेंडू गोलपोस्टच्या जवळ मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेत असताना गदीने गोलपोस्ट सोडला आणि तो धावत चेंडूच्या दिशेने गेला. यावेळी डोक्याने चेंडू मारत त्याने प्रतिस्पर्धी संघाचा गोल करण्याचा प्रयत्न फोल ठरवला. पण गदीने मारलेला हा चेंडू प्रतिस्पर्धी खेळाडूकडे गेला. त्यावेळी गदी हा गोलपोस्पेक्षा फार लांब होता. प्रतिस्पर्धी खेळाडूने या गोष्टीचा चांगलाच फायदा उचलला आणि गोलपोस्टच्या दिशेने चेंडू तटवला. हा चेंडू आता गोलपोस्टमध्ये जाणार असेल वाटत होते. पण तेवढ्याच गदी हा जोरात धावत गोलपोस्टजवळ आला आणि त्याने आपल्या डोक्याने चेंडू मैदानाबाहेर ढकलला. या दोन्ही गोष्टी गदीने फक्त पाच सेकंदांमध्ये केल्या. त्यामुळे आता जगभरात गदीचे चांगलेच कौतुक होत आहे.

टॅग्स :Footballफुटबॉल