जीतू, हीनाला आशियाई पदक, भारताची पदकसंख्या १७ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 01:22 AM2017-12-11T01:22:05+5:302017-12-11T01:22:20+5:30

दिग्गज पिस्तूल नेमबाज जीतू राय आणि हीना सिद्धू यांनी जपानमध्ये शानदार कामगिरी केली. वाको सिटी येथे सुरू असलेल्या १० व्या आशियाई स्पर्धेत त्यांनी १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारताला कांस्यपदक मिळवून दिले.

 Jitu, Heena, Asian Medal, India's Medal 17 | जीतू, हीनाला आशियाई पदक, भारताची पदकसंख्या १७ वर

जीतू, हीनाला आशियाई पदक, भारताची पदकसंख्या १७ वर

Next

नवी दिल्ली : दिग्गज पिस्तूल नेमबाज जीतू राय आणि हीना सिद्धू यांनी जपानमध्ये शानदार कामगिरी केली. वाको सिटी येथे सुरू असलेल्या १० व्या आशियाई स्पर्धेत त्यांनी १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारताला कांस्यपदक मिळवून दिले. जीतू याने पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल वैयक्तिक गटात कांस्यपदकासह शाहजार रिज्वी आणि ओंकार सिंह यांच्यासोबत सांघिक गटात सुवर्णपदकही पटकाविले. दुसरीकडे, महिला गटात हीना हिने १० मीटर गटात कांस्यपदकासह श्री निवेथा परमाथन आणि हरवीन सराओ यांच्यासोबत सांघिक गटात रौप्यपदक पटकाविले.
पहिल्या दोन दिवसांत ११ पदके पटकाविणारा भारतीय संघ तिसºया दिवशी १७ पदकांवर पोहोचला. आता भारताकडे ४ सुवर्ण, ६ रौप्य आणि ७ कांस्यपदके झाली आहेत. १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात रिज्वी हा क्वालिफिकेशनमध्ये ५८३ गुणांसह अव्वल स्थानावर राहिला. जीतूने क्वालिफाइंगमध्ये ५७७ गुणांसह पाचवे स्थान पटकाविले. रिज्वीसोबत आठ नेमबाजांनी फायनलमध्ये जागा मिळवली आहे. ओंकार ५७५ गुणांसह दहाव्या स्थानावर राहिला. तो फायनलमध्ये जागा मिळवू शकला नाही; परंतु जीतू आणि रिज्वी यांच्यासोबत त्याने सांघिक गटात १७३५ गुणांसह सुवर्णपदक मिळवून दिले. चीन १७२९ गुणांसह दुसºया, तर व्हिएतनाम १७२८ गुणांसह तिसºया क्रमांकावर राहिला. भारताच्या त्रिकुटाने एकूण ११३२ गुणांसह रौप्यपदक पटकाविले. (वृत्तसंस्था)
 

Web Title:  Jitu, Heena, Asian Medal, India's Medal 17

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.