शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

जयराम, प्रणय दुसऱ्या फेरीत

By admin | Updated: October 20, 2016 04:21 IST

एच. एस. प्रणय यांनी विजयी सुरुवात करताना बुधवारी येथे डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला

ओडेंसे : भारतीय शटलर अजय जयराम आणि एच. एस. प्रणय यांनी विजयी सुरुवात करताना बुधवारी येथे डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला; परंतु बी. साईप्रणीत याचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले.डच ओपनचा उपविजेत्या जयरामने अपेक्षेनेरूप कामगिरी करताना थायलंडच्या बुनसाक पोनसानाचा ३६ मिनिटांत २१-१५, २१-१६ असा सलग गेममध्ये पराभव केला. जयरामसमोर दुसऱ्या फेरीत क्वॉलिफायर चीनचा शी युकी आणि डेन्मार्कचा तृतीय मानांकित जान ओ जोर्गेनसन यांच्यातील विजयी खेळाडूचे आव्हान असेल.प्रणयने मलेशियाच्या वेई फेंग चोंग याला १ तास ३ मिनिटे रंगलेल्या संघर्षपूर्ण लढतीत २१-१३, १९-२१, २२-२० असे पराभूत केले. प्रणीतला थायलंडच्या तानोंगसाक सेनसोमबूनसुकविरुद्ध १ तास २ मिनिटांच्या लढतीत १७-२१, २१-१९, १५-२१ असा पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर प्रणीतचा थायलंडच्या खेळाडूविरुद्ध कारकिर्दीत ०-२ असा रेकॉर्ड झाला आहे. प्रणीत या वर्षी इंडोनेशिया मास्टर्समध्येदेखील १८व्या मानांकित खेळाडूकडून पराभूत झाला होता.मिश्र दुहेरीत प्रणव जैरी चोपडा आणि एन. सिक्की रेड्डी या भारतीय जोडीलादेखील पहिल्या फेरीत पराभव पत्करावा लागला. त्यांना पाचव्या मानांकित डेन्मार्कच्या जाओकिम फिशर निल्सन आणि क्रिस्टिना पेडरसन या जोडीकडून ३६ मिनिटांत १५-२१, १४-२१ असा पराभव पत्करावा लागला. पुरुष दुहेरीत मनू अत्री व बी. सुमीत रेड्डी यांना डेन्मार्कच्या किम एस्ट्रप आणि एंडस सॅमसुसैन यांनी ३२ मिनिटांत २१-१०, २१-१९ असे पराभूत केले.