जपान ओपनमध्ये घोषालने प्रबळ प्रतिद्वंद्वीला हरवले

By Admin | Updated: June 20, 2014 21:24 IST2014-06-20T21:24:55+5:302014-06-20T21:24:55+5:30

In the Japan Open, Ghoshal defeated a strong opponent | जपान ओपनमध्ये घोषालने प्रबळ प्रतिद्वंद्वीला हरवले

जपान ओपनमध्ये घोषालने प्रबळ प्रतिद्वंद्वीला हरवले

>योकोहामा: युवा भारतीय स्टार सौम्यजीत घोषालने आपल्या कारकिर्दीतील सर्वात मोठा विजय नोंदवताना आयटीएफ विश्व टूर जपान ओपन टेबल टेनिसच्या पहिल्या फेरीमध्ये जागतिक 76 व्या क्रमांकाचा खेळाडू रशियाच्या अलेक्सी लिवेंत्सोवाचा पराभव केला़ सौम्यजीतने या लढतीत 16-14, 9-11, 12-14, 14-12, 8-11, 11-8, 11-3 असा विजय नोंदवला़ जागतिक 140 व्या क्रमांकाच्या घोषालचा सामना आता हाँगकाँगच्या 19 वे मानांकित तांग पेंगशी होईल़ भारताचा सर्वोच्च रँकिंगधारी शरत कमल (40) याने सिंगापूर च्यू चे यू क्लारेंसचा 11-2, 7-11, 11-8, 8-11, 11-8, 5-11, 12-10 असा पराभव केला़ आता त्याचा सामना रशियाच्या किरिल स्काचकोवशी होईल़ विद्यमान राष्ट्रीय चॅम्पियन सानिल शे?ी पहिल्याच फेरीमध्ये जपानच्या कोकी निवाकडून पराभूत झाला होता़ (वृत्तसंस्था)
------------------------------------------------
अमेरिकेविरुद्धच्या पुढील सामन्यातून रोनाल्डोची बाहेर राहण्याची शक्यता
मनाउस: र्जमनीविरुद्धच्या पहिल्या सामन्यामध्ये फ्लॉप राहिलेला पोतरुगालचा स्टार स्ट्रायकर ख्रिस्तियानो रोनाल्डो गुडघ्याच्या दुखापतीमुळे अमेरिकेविरुद्ध रविवारी होणार्‍या विश्वकपच्या पुढील सामन्यातून बाहेर राहण्याची शक्यता आह़े एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार रोनाल्डोने बुधवारी संपूर्ण सराव सत्रामध्ये भाग घेतलेला नाही़ आणि त्याच्या डाव्या गुडघ्यावर बर्फ चोळत असताना पाहण्यात आल़े पोतरुगाल फुटबॉल संघाने मात्र याबाबत अद्यापही कोणतेही विधान केलेले नाही़ र्जमनीविरुद्धच्या पहिल्या सामन्यापूर्वीदेखील रोनाल्डोच्या फिटनेसबाबत जोरदार चर्चा सुरु होती़ तो या दुखापतीमुळे दोन सराव सामन्यामध्येदेखील खेळू शकला नव्हता आणि र्जमनीविरुद्धदेखील संघर्ष करताना दिसून आला़ डिफेंडर फेबियो कोएंट्राओ आणि स्ट्रायकर हुगो अलमेइडा देखील पायाच्या दुखातीमुळे रविवारच्या सामन्यातून बाहेर राहणार आह़े र्जमनीने पहिल्या सामन्यामध्ये पोतरुगालला 4-0 ने हरविले होत़े (वृत्तसंस्था)

Web Title: In the Japan Open, Ghoshal defeated a strong opponent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.