जयराम, गुरुसाईदत्त उपांत्यपूर्व फेरीत

By Admin | Updated: October 10, 2015 05:33 IST2015-10-10T05:33:24+5:302015-10-10T05:33:24+5:30

गत चॅम्पियन अजय जयराम आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदकविजेता आर. एम. व्ही. गुरुसाईदत्त यांनी ५०,००० डॉलर बक्षीस रकमेच्या डच ओपन ग्रांप्री बॅडमिंटनमध्ये

Jairam, Gurusaidutt quarter-finals | जयराम, गुरुसाईदत्त उपांत्यपूर्व फेरीत

जयराम, गुरुसाईदत्त उपांत्यपूर्व फेरीत

अल्मेरे : गत चॅम्पियन अजय जयराम आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदकविजेता आर. एम. व्ही. गुरुसाईदत्त यांनी ५०,००० डॉलर बक्षीस रकमेच्या डच ओपन ग्रांप्री बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला.
जागतिक क्रमवारीत २५व्या स्थानावर असणाऱ्या जयरामने फिनलंडच्या कास्पर लेइकोइनेन याचा २१-१४, २१-१३ असा पराभव केला. आता त्याची लढत मलेशियाच्या इस्कंदर जुल्करनैन जैनुद्दीन याच्याशी होईल. त्याच्याविरुद्ध त्याचे रेकॉर्ड २-१ असे आहे.
नवव्या मानांकितप्राप्त गुरुसाइदत्त याने युक्रेनच्या दमित्रो जवादस्की याचा २१-१२, १२-११ असा पराभव केला. आता तो १२ व्या मानांकित एस्तोनियाच्या राउल मस्ट याच्याविरुद्ध दोन हात करेल. या दोघांत पाच वर्षांआधी डेन्मार्क ओपनमध्ये झालेल्या लढतीत गुरुसाईदत्तने विजय मिळवला होता, तर राऊल २०१० जर्मन ओपनमध्ये विजयी ठरला होता.
मनु अत्री आणि बी. सुमित रेड्डी यांनी पुरुष दुहेरीत नेदरलँडच्या मार्क सी आणि जेले मास यांचा २१-१३, १९-२१, २१-१८ असा पराभव केला. आता त्यांची लढत जर्मनीच्या मॅक्स श्वेंगर आणि जोशे जर्वोने याच्या विरुद्ध होईल. महिला एकेरीत पी. सी. तुलसीला आयर्लंडच्या श्लोए मॅगी हिने २१-१९, २१-२३ व २१-१९ असे पराभूत केले.

Web Title: Jairam, Gurusaidutt quarter-finals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.