शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पुनरागमन ठरले यशस्वी - जडेजा

By admin | Updated: December 6, 2015 01:45 IST

भारतीय संघात यशस्वी पुनरागमन करणाऱ्या रवींद्र जडेजाने नशिबवान असल्याचे कबूल केले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत २१ बळी घेत जडेजाने शानदार पुनरागमन केले.

नवी दिल्ली : भारतीय संघात यशस्वी पुनरागमन करणाऱ्या रवींद्र जडेजाने नशिबवान असल्याचे कबूल केले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत २१ बळी घेत जडेजाने शानदार पुनरागमन केले. पुनरागमनानंतर सर्वकाही अनुकूल घडले, असे जडेजा म्हणाला. रणजी स्पर्धेत ३४ बळी घेतल्यानंतर जडेजाने कसोटी संघात पुनरागमन केले. चौथ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात ३० धावांच्या मोबदल्यात पाच बळी घेणारा जडेजा म्हणाला,‘मी सहा महिने संघाबाहेर होतो. रणजी स्पर्धेत तीन सामने खेळण्याची संधी मिळाली. नशिबाची साथ मिळाली आणि खेळपट्ट्याही फिरकीला अनुकूल मिळाल्या. मी बरीच मेहनत घेत आहे, यात काही संशय नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका प्रारंभ होण्यापूर्वी रणजी स्पर्धा प्रारंभ झाली. माझ्यासाठी सर्वकाही अनुकूल घडले.’जडेजाने सांगितले की,‘आम्ही पहिल्या डावात चांगली फलंदाजी केली. दक्षिण आफ्रिका संघाला पहिल्या डावात लौकिकाला साजेशी फलंदाजी करता आली नाही. त्यामुळे भारतीय संघाला २१३ धावांची भक्कम आघाडी घेता आली. खेळपट्टी यानंतर यापेक्षा खडतर होईल आणि आम्हाला वर्चस्व गाजवण्याची संधी राहील. दुसऱ्या डावात त्यांना बाद करावे लागेल. नागपूरच्या तुलनेत ही खेळपट्टी चांगली आहे. फिरकीपटूंची कामगिरी एकमेकांना पूरक ठरत आहे. रणजी ट्रॉफी सामन्यात जशी गोलंदाजी करतो तशीच गोलंदाजी येथे केली. अश्विन, मी आणि अमित मिश्रा एकमेकांना मदत करीत असतो. मला प्रत्येक लढतीत स्वत:ला सिद्ध करायचे आहे.’संघाबाहेर असताना काही काळ निराश झालो होतो. याबाबत बोलताना जडेजा म्हणाला,‘मी निराश झालो होतो. यातून सावरणे आवश्यक आहे, याची मला कल्पना आली. आता चांगल्या कामगिरीमुळे आगामी सामन्यांमध्ये चमकदार कामगिरीची आशा आहे. (वृत्तसंस्था)