इटली, उरुग्वेचे ‘मिशन 16’
By Admin | Updated: June 24, 2014 01:27 IST2014-06-24T01:27:32+5:302014-06-24T01:27:32+5:30
फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत ड गटात मंगळवारी इटली आणि उरुग्वे या संघांत झुंज रंगणार आह़े या लढतीत विजय मिळवून अंतिम 16 संघांत स्थान मिळविण्याच्या उद्देशाने दोन्ही संघ मैदानात उतरतील़

इटली, उरुग्वेचे ‘मिशन 16’
>नटाल : फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत ड गटात मंगळवारी इटली आणि उरुग्वे या संघांत झुंज रंगणार आह़े या लढतीत विजय मिळवून अंतिम 16 संघांत स्थान मिळविण्याच्या उद्देशाने दोन्ही संघ मैदानात उतरतील़
2क्1क् च्या विश्वकपमध्ये उपांत्य फेरीत मजल मारणारा उरुग्वे संघ आपला स्टार स्ट्राईकर लुईज सुआरेजच्या शानदार कामगिरीच्या बळावर स्पर्धेत उलटफेर करून बाद फेरीत पोहोचण्यास उत्सुक आहे, तर इटली संघसुद्धा साखळी फेरीतील अखेरच्या लढतीत सरशी साधून पुढच्या फेरीत पोहोचण्यासाठी इच्छुक आह़े
ड गटात सध्या कोस्टारिका संघाने सर्वाधिक 6 गुणांसह जवळपास बाद फेरीत प्रवेश केला आहे, तर इटली आणि उरुग्वेचे दोन सामन्यांत एका विजयासह प्रत्येकी 3 गुण आहेत़ (वृत्तसंस्था)
उरुग्वेला डिएगोच्या फिटनेसची चिंता
या लढतीत खेळण्यासाठी उरग्वेच्या सुआरेजला पूर्णपणो फिट घोषित करण्यात आले असले, तरी त्यांचा कर्णधार डिएगो लुगानो याच्या फिटनेसबद्दल संघाला चिंता आह़े तो या लढतीत खेळेल किंवा नाही हे अद्याप स्पष्ट झाले नाही़