इटलीचा सायकलिस्ट विन्सेन्जो निबाली जखमी
By Admin | Updated: August 7, 2016 21:31 IST2016-08-07T21:31:57+5:302016-08-07T21:31:57+5:30
इटलीचा सायकलिस्ट विन्सेन्जो निबाली पुरुषांच्या रोड रेस फिनिशिंग लाईनजवळ झालेल्या अपघातात जखमी झाला़

इटलीचा सायकलिस्ट विन्सेन्जो निबाली जखमी
रिओ डि जेनेरिओ: इटलीचा सायकलिस्ट विन्सेन्जो निबाली पुरुषांच्या रोड रेस फिनिशिंग लाईनजवळ झालेल्या अपघातात जखमी झाला़ यामध्ये त्याचे दोन्ही कॉलरबोन (गळ्याचे हाड) तुटले आहेत़ निबाली रेसमध्ये आघाडीवर होता़ त्याची कोलंबियाच्या सर्जियो हेनाओ आणि पोलँडच्या रफाल माज्का यांच्यासोबत चुरस लागली होती़ तेव्हा त्याने आपले नियंत्रण गमावले आणि खाली कोसळला़ ३१ वर्षीय निबालीने फ्रान्स, स्पेन आणि इटलीमध्ये झालेल्या तीन ग्रँड टूरमध्ये विजय नोंदविला होता़ आतापर्यंत त्याला तीन आॅलिम्पिकमध्ये एकही पदक जिंकता आले नाही़.