शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

दबाव नसेल तर मजा येणार नाही, श्रीलंका दौऱ्यामध्ये नव्याने सुरुवात करेन - सूर्यकुमार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 09:40 IST

आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यानंतर मायदेशात झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतून सूर्यकुमारने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

कोलंबो : ‘दिग्गज राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली खेळण्याचा अनुभव शानदार ठरणार आहे. कायम शांत आणि एकाग्रतेने काम करणाऱ्या द्रविड यांच्याकडून श्रीलंका दौऱ्यात शिकण्यासाठी खूप उत्सुक असून, यावेळी नव्याने सुरुवात करण्याचा प्रयत्न करेन,’ अशी प्रतिक्रिया आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शानदार पदार्पण केलेल्या सूर्यकुमार यादव याने दिली.आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यानंतर मायदेशात झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतून सूर्यकुमारने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पहिल्याच सामन्यात त्याने अर्धशतक झळकावत आपली क्षमता सिद्ध केली होती. सध्या शिखर धवनच्या नेतृत्वात श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघातील प्रमुख फलंदाजांपैकी एक म्हणून सूर्यकुमारचा समावेश आहे.मुंबईकर सूर्यकुमारने प्रसारमाध्यमांशी ऑनलाइन संवाद साधताना म्हटले की, ‘मालिकेत दबाव असणारंच. कारण दबाव नसेल तर मजा येणार नाही. हे एक मोठे आव्हान असेल आणि यासाठी मी अत्यंत उत्सुक आहे. इंग्लंडविरुद्धची मालिका माझ्यासाठी पूर्णपणे वेगळे आव्हान होते. जेव्हापण तुम्ही मैदानात पाऊल ठेवता, तेव्हा तुम्ही वेगळा खेळ सादर करता. प्रत्येक वेळी नवी सुरुवात होत असते. लंका दौऱ्यातही मला नव्याने सुरुवात करायची आहे. इंग्लंडविरुद्धची मालिका वेगळी होती आणि आता ही श्रीलंकेविरुद्धची मालिका वेगळी आहे. मात्र आव्हान तसेच आहे. त्यामुळे मला कामगिरीत सातत्य राखायचे आहे.’द्रविडच्या मार्गदर्शनाखाली खेळण्याबाबत सूर्यकुमार म्हणाला की, ‘प्रत्येक खेळाडूसाठी ही शानदार संधी आहे. सध्याच्या परिस्थितीत प्रवास करणे मोठे आव्हान आहे. मात्र, दौऱ्याची सर्वात चांगली बाब म्हणजे राहुलसर जवळपास राहणार आहेत. मी त्यांच्याविषयी खूप ऐकले आहे. त्यांच्यासोबत हा माझा पहिलाच दौरा आहे. मी अनेक खेळाडूंकडून ऐकले आहे की, ते प्रशिक्षक म्हणून अत्यंत शांत आणि एकाग्र आहेत.’

गोलंदाजीचा निर्णय हार्दिकच घेईल गेल्या अनेक महिन्यांपासून दुखापतीने त्रस्त असलेल्या अष्टपैलू हार्दिक पांड्याने सराव सामन्यात आणि नेट्समध्ये गोलंदाजी केली. याविषयी सूर्यकुमार म्हणाला की, ‘इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत हार्दिकने गोलंदाजी केली. आयपीएलमध्ये त्याने गोलंदाजी केली नव्हती. यानंतर इंट्रा-स्क्वाड (सराव सामना) लढतीत आणि सराव सत्रामध्येही त्याने गोलंदाजी केली. सामन्यातील गोलंदाजीचा निर्णय त्याच्यावर आणि संघ व्यवस्थापनावर अवलंबून आहे. पण तो गोलंदाजी करतोय, हे मात्र नक्की. ही खूप चांगली बाब आहे.’ 

टॅग्स :Indian Cricket Teamभारतीय क्रिकेट संघIndiaभारतSri Lankaश्रीलंका