सकारात्मक संदेश देणे हाच होता हेतू!
By Admin | Updated: March 16, 2016 08:39 IST2016-03-16T08:39:24+5:302016-03-16T08:39:24+5:30
भारताप्रति प्रेम जाहीर केल्यानंतर नाराजी झेलणारा पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार शाहीद आफ्रिदीने मंगळवारी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले. तो म्हणाला, ‘‘माझा हेतू केवळ

सकारात्मक संदेश देणे हाच होता हेतू!
कोलकाता : भारताप्रति प्रेम जाहीर केल्यानंतर नाराजी झेलणारा पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार शाहीद आफ्रिदीने मंगळवारी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले. तो म्हणाला, ‘‘माझा हेतू केवळ भारतात राहणाऱ्या माझ्या चाहत्यांचे आभार मानणे आणि एक सकारात्मक संदेश देणे, हाच होता.’’
आफ्रिदीने विश्वचषक खेळण्यासाठी भारतात आल्यानंतर म्हटले होते, की इतर देशांपेक्षा
भारतात खेळणे अधिक पसंत आहे. येथे त्याला पाकिस्तानी समर्थकांकडून अधिक प्रेम मिळते. या वक्तव्यानंतर काही दिग्गज क्रिकेटपटूंनी
आफ्रिदीवर चारही बाजूंनी टीका केली. तसेच, कायदेशीर
नोटीसही जारी करण्यात आली. पाकिस्तान क्रिकेट मंडळाने आफ्रिदीच्या ट्विटरवर एका आॅडिओ संदेशात म्हटले, की कर्णधाराचा हेतू केवळ पाकिस्तानी समर्थकांनाच महत्त्व देणे नसते.
यावर आफ्रिदीने स्पष्टीकरण देताना म्हटले, की मी केवळ पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार नाही, तर संपूर्ण पाकिस्तानी लोकांचे प्रतिनिधित्व करतो. जर कोणी माझ्या वक्तव्याला सकारात्मकतेने घेत असेल, तर त्यांना समजेल, की मी पाकिस्तानी समर्थकांना कमी महत्त्व देतो असे नाही. माझी ओळख ही पाकिस्तानमुळे आहे.
दरम्यान, पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियाँदादने आफ्रिदीच्या वक्तव्यावर प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. त्याने हे लज्जास्पद असल्याचे म्हटले होते. (वृत्तसंस्था)
एवढेच नव्हे, तर लाहोरमध्ये तर आफ्रिदीच्या वक्तव्यावरून नोटीस जाहीर करण्यात आली होती. अशा वक्तव्यापासून बचाव करावा, असा सल्लाही आफ्रिदीला देण्यात आला.
आफ्रिदीच्या मदतीला वकार
भारतप्रेमामुळे पाकिस्तानी जनतेच्या चौफेर टिकेचा धनी बनलेल्या कर्णधार शाहिद आफ्रिदीच्या मदतीला प्रशिक्षक वकार युनिस धावला असून शाहीदने फक्त आपल्या भावना बोलून दाखवल्या, यात विवादास्पद काहीच नाही असे त्याने म्हटले आहे.