शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
13
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
14
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
15
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
16
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
17
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
18
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
20
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"

विश्वचषक नेमबाज : ज्युनिअर गटात विश्वविक्रमासह सौरभ चौधरीचा सुवर्णवेध

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2018 2:20 AM

सौरभ चौधरीने आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत विश्वविक्रमासह ज्युनिअर १० मीटर एअर पिस्तुल गटात सुवर्णपदकाला गवसणी घातली.

चांगवोन : सौरभ चौधरीने आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत विश्वविक्रमासह ज्युनिअर १० मीटर एअर पिस्तुल गटात सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्याचवेळी अभिषेक वर्माला गुरुवारी सिनिअर गटात आठव्या स्थानावर समाधान मानावे लागल्यामुळे आॅलिम्पिक कोटा मिळविता आला नाही.सौरभने ५८१ गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहताना अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली. त्याने फायनलमध्ये २४५.५ अंकांची नोंद करीत आपलाच विश्वविक्रम मोडला. अर्जुनसिंग चीमाने आठ खेळाडूंच्या फायनलमध्ये २१८ अंकांसह कांस्यपदक पटकावले. सौरभने सर्वप्रथम जून महिन्यात आयएसएसएफ विश्वकपदरम्यान १० मीटर एअर पिस्तुलमध्ये विश्वविक्रम नोंदवला होता. पात्रता फेरीत अव्वल स्थानावर असलेला कोरियाचा होजिन लिम २४३.१ अंकांसह रौप्यपदकाचा मानकरी ठरला.सौरभच्या स्पर्धेत अर्जुनसिंग चीमाने कांस्यपदक पटकावले, तर भारतीय संघ आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या १६ वर्षीय सौरभच्या चमकदार वैयक्तिक कामगिरीच्या जोरावर रौप्यपदक पटकावण्यात यशस्वी ठरला. सौरभ, चीमा व अनमोल यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने एकूण १७३० गुणांची कमाई करत रौप्यपदकाचा मान मिळवला. १७३२ गुणांची नोंद करणारा कोरियन संघ विश्वविक्रमासह सुवर्णपदक पटकावण्यात यशस्वी ठरला. रशियाने १७११ गुणांसह कांस्यपदक पटकावले.सिनिअर गटात भारतीय नेमबाज वैयक्तिक छाप सोडण्यात अपयशी ठरले, पण १० मीटर एअर पिस्तुल सांघिक स्पर्धेत रौप्यपदक पटकावण्यात यशस्वी ठरले. रौप्यपदक विजेत्या संघात वर्माचा समावेश होता. आशियाई स्पर्धेत कांस्यपदक पटकावणाºया वर्माने पात्रता फेरीत ५८३ गुणांची नोंद केली. त्याने १० मीटर एअर पिस्तुल स्पर्धेत पात्रता फेरीत तिसरे स्थान पटकावित अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली व भारताच्या पदकाच्या आशा कायम राखल्या. अभिषेक अंतिम फेरीत ११८ गुणांसह आठव्या व अखेरच्या स्थानी राहिला. कोरियाच्या जिन जोंहोहने सुवर्णपदक पटकावले. जोंगोह व रशियाचा आर्तेम चेर्नेसोव्ह यांचे समान २४१.५ गुण होते, पण कोरियन नेमबाजाने शूटआॅफमध्ये बाजी मारली. अभिषेक, मिथरवाल व रिज्वी यांचा समावेश असलेला संघ रौप्यपदक पटकावण्यात यशस्वी ठरला. सिनिअर गटात वर्मा, ओमप्रकाश मिथरवाल आणि शाहजार रिज्वी या त्रिकुटाने १० मीटर एअर पिस्तुल स्पर्धेत एकूण १७३८ गुणांसह संघाला रौप्यपदक पटकावून दिले. (वृत्तसंस्था)ज्युनिअर ट्रॅप संघाचे चंदेरी यशभारताच्या ज्युनिअर पुरुष ट्रॅप संघाने रौप्यपदकाचा मान मिळवला. भारतीय संघात अमान अली इलाही, विवान कपूर व मानवादित्य सिंग राठोड यांचा समावेश होता. त्यांनी एकूण ३४८ गुणांची नोंद केली. या स्पर्धेत आॅस्ट्रेलियाने अव्वल स्थान पटकावले.ज्युनिअर ट्रॅपमध्ये अमनने पात्रता फेरीत ११८ गुणांची नोंद करीत सहा नेमबाजांच्या फायनलमध्ये स्थान मिळवले. तेथे मात्र त्याला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. अमानने चार नेमबाजांच्या शूटआॅफनंतर अंतिम फेरीत स्थान मिळवले होते.महिला ट्रॅपमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या श्रेयसी सिंगला १२५ पैकी ११० नेम लगावता आले. ती ३४ व्या स्थानावर राहिली.सीमा तोमर (१०८) ४१ व्या तर वर्षा वर्मन (१०७) ४२ व्या स्थानी राहिली. भारतीय संघ ३२५ गुणांसह आठव्या स्थानी राहिला.पाचव्या दिवसाअखेर भारताने चार सुवर्ण, सहा रौप्य आणि चार कांस्यपदकांसह एकूण १४ पदके पटकावली आहेत. भारतीय संघ कोरिया व रशिया यांच्यानंतर तिसºया स्थानी आहे.

टॅग्स :Shootingगोळीबार