आयएसएल लीग कॉलम१

By Admin | Updated: December 3, 2014 22:35 IST2014-12-03T22:35:50+5:302014-12-03T22:35:50+5:30

जॉन डायक्स

ISL league column 1 | आयएसएल लीग कॉलम१

आयएसएल लीग कॉलम१

न डायक्स
दर्जेदार आयएसएलचा पाया भक्कम!
मुंबईतील एक दमट पण उष्ण सायंकाळ! जे स्टेडियम पारंपरिकरीत्या क्रिकेटशी निगडित आहे तेथे जागतिक फुटबॉल अवतरले. या नव्या अध्यायाचा मी साक्षीदार होतो. हा प्रकार काय आहे हे पाहण्यासाठी मी लंडनहून विमानात बसलो त्यावेळी भारतात गोवा एफसी आणि आणि मुंबई एफसी हिरो इंंडियन सुपर लीगमध्ये झुंज देत होते.ही लढत पाहण्यासाठी २२ हजार फुटबॉल चाहते नवी मुंबईत उपस्थित होते.
दशकाहून अधिक काळ मी फुटबॉलचे वैभव असलेल्या बार्कलेज प्रीमियर लीगमध्ये घालविला. पण आता भारतीय फुटबॉल रसिकांसाठी निर्माण होत असलेल्या या नव्या लीगची एक झलक पाहण्यासाठी आतूर होतो. सोमवारी रात्री डी.वाय. पाटील स्टेडियमचा अनुभव या लीगबद्दचे माझे मत अधिक दृढ करणारे ठरले. एक उत्तम ब्रॅन्ड आणि नियोजन, आमीर खान, रणबीर कपूरसारख्या अभिनेत्यांच्या उपस्थितीत पाहिलेला हा सामना मला सुखावून गेला. सामना बरोबरीत सुटला. पण मुंबईचा स्टार फ्रान्सचा खेळाडू निकोलस अनाल्का याच्याकडून आशा होत्या.पण बाकिच्यांकडूनही तितक्याच अपेक्षा आहेत. विदेशी खेळाडूंसाठी वेळापत्रक आव्हानात्मक आहे तर दुसरीकडे स्थानिक खेळाडूंना गोल नोंदविण्यात अडसर जाणवत आहे.
आयएसएलच्या आयोजकांनी मात्र धास्तावण्याची किंवा काळजी करण्याची गरज नाही. आयएसएलने प्रेक्षकांवरील पकड घट्ट केली आहे. वर्षागणिक आयएसएल वाटचाल करेल तसा खेळाचा दर्जा सुधारत जाईल. जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेतील फुटबॉलचे प्रयोग पाहिले तर भारतात या लीगने आतापासूनच प्रगती केल्याचे निष्पन्न होते.
जपानने जे लीगची १९९३ साली सुरुवात केली. चांगल्या सुरुवातीनंतर मात्र त्यांची उपस्थितीची सरासरीसारखी घसरत आहे. आयएसएलची सरासरी उपस्थिती २५ हजार आहे. अमेरिकेत १९९६ ला मेजर लीग सॉकरला प्रारंभ झाला. पहिल्या पाच वर्षांत त्यांना २५० मिलियन डॉलरचा तोटा सहन करावा लागला. आयएसएलबाबत असे काही होण्याची शक्यता कमी आहे.
ऑस्ट्रेलियाच्या ए लीगने २००५ पासून सावध वाढ दाखविली आहे. १५४ देशात टिव्हीवरून लीगचे प्रक्षेपण होत असल्याने ही वाढ अपेक्षित आहे. आयएसएल ही धाडसी आणि महत्त्वाकांक्षी लीग असल्याने लीगबद्दलचे माझे मत सकारात्मक आहे. खेळाडू धाडसीवृत्ती दाखवित असून चाहते गर्दी करीत आहेत. अर्थात सामन्यांच्या वेळापत्रकात सुधारणा करण्यास वाव आहे शिवाय जागतिक फुटबॉलने दखल घ्यावी इतका भक्कम पाया लीगला लाभला आहे.(टीसीएम) (लेखक आंतरराष्ट्रीय क्रीडा समालोचक आहेत.)

Web Title: ISL league column 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.