आयएसएलने स्पर्धात्मक वातावरण दिले!
By Admin | Updated: December 4, 2014 01:51 IST2014-12-04T01:51:26+5:302014-12-04T01:51:26+5:30
भारतीय फुटबॉलमध्ये दिलेल्या योगदानासाठी गेल्या आठवड्यात मला जो हॉफ आॅफ फेम मिळाला तो मी माझा मोठा बहुमान मानतो

आयएसएलने स्पर्धात्मक वातावरण दिले!
भारतीय फुटबॉलमध्ये दिलेल्या योगदानासाठी गेल्या आठवड्यात मला जो हॉफ आॅफ फेम मिळाला तो मी माझा मोठा बहुमान मानतो. आशियाई किंवा भारतीय वंशाच्या माणसाला मिळालेला हा सन्मान निश्चितच मोठा आहे. भारतासाठी खेळण्याचे आणि संघाचे प्रतिनिधित्व करण्याचे मला भाग्य लाभले. माझ्या परिश्रमाचे चीज झाले. यामुळे मोठ्या लोकांच्या पंक्तित जाऊन बसलो याचाही आनंद आहे.
विदेशात मी बरी एफसीकडून खेळण्याचा अनुभव घेतला. माझ्या कारकीर्दीत आयएसएल असती तर बरे वाटले असते. मोठे खेळडू आणि मान्यवर प्रशिक्षकांसोबत खेळण्याचा आनंद विरळाच. आव्हानात्मक कामगिरी आणि तुल्यबळ प्रतिस्पर्धी मिळावे यासाठी खेळाडू परदेशात जातात. उत्कृष्ट खेळाडूंविरुद्ध किंवा सोबत खेळून तुम्ही
स्वत:चा दर्जा सुधारू शकता. हिरो आयएसएलमुळे भारतीयांना ती संधी उपलब्ध झाली ती देखील भारतात! चांगल्या खेळाडूंना सुधारायची यामुळे संधी मिळेल आणि परिस्थितीत बदल घडून येईल.
तरुण खेळडूंना आणखी संधी हवी, या नॉर्थ ईस्ट युनायटेडचा प्रशिक्षक रिकी हर्बर्ट याच्या मताशी मी सहमत आहे. नॉर्थ ईस्ट युनायटेड तरुण पण अनुभवहीन संघ आहे. नॉर्थ ईस्ट युनायटेडचे मोठे खेळाडू विविध संघांकडून खेळताना दिसतात पण गुणवत्ता असूनही अनुभव नसल्याने यंदा त्यांना फारशी चमक दाखविता आली नाही. या स्पर्धेत अॅटलिटिको डी कोलकाता आणि चेन्नईयन हे माझे फेव्हरिट आहेत पण गोव्याला कमी लेखता येणार नाही.
या संघाने दमदार पुनरागमन केले. चेन्नई तगडा संघ आहे पण माझ्या भाकीतानुसार एलिनोसारख्या खेळाडूची दुखापत उपांत्य लढतीसाठी महागडी ठरू शकते. कोलकाताची घसरण झाली तरी उपांत्य फेरीसाठी हा संघ माझ्या मताप्रमाणे दावेदार असेल. बाद फेरीचे दडपण खेळाडूंवर असल्याचे हबासने कबूल केले. खरेतर असे घडायला नको. (टीसीएम)