इरफान संपूर्ण घरेलू सत्रामध्ये खेळण्यास सज्ज

By Admin | Updated: September 12, 2014 22:38 IST2014-09-12T22:38:20+5:302014-09-12T22:38:20+5:30

Irfan ready to play in the entire domestic season | इरफान संपूर्ण घरेलू सत्रामध्ये खेळण्यास सज्ज

इरफान संपूर्ण घरेलू सत्रामध्ये खेळण्यास सज्ज

>नवी दिल्ली: भारतीय संघातून प्रदीर्घ काळापासून बाहेर असलेला अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने टी-20 क्रिकेटला प्राधान्य देण्याच्या वृत्ताचे खंडन करताना म्हटले की, भारतीय संघामध्ये परतण्यासाठी तो संपूर्ण घरेलू सत्रामध्ये खेळणार आह़े इरफानने शेवटच्या सामन्यात सन 2012 मध्ये विश्वकप टी-20 स्पर्धेसाठी राष्ट्रीय संघामध्ये स्थान पटकावले होत़े त्यानंतर तो दुखापतीमुळे संघर्ष करीत आह़े तो म्हणाला, मी पुनश्च राष्ट्रीय संघामध्ये स्थान पटकावण्यासाठी अथक पर्शिम घेत आह़े लोकांना जे बोलावयाचे आहे ते त्यांना बोलू द्या़ विश्वकप डोळ्यासमोर ठेवून मी अधिकाधिक रणजी ट्रॉफी, आणि घरेलू सामने खेळू इच्छितोय़ त्यानंतर माझे लक्ष्य भारतीय संघामध्ये खेळणे हे राहणार आह़ेअखेरच्या दोन घरेलू सत्रामध्ये त्याने केवळ पाच प्रथर्मशेणी सामने खेळले होत़े ज्यामध्ये रणजीच्या चार सामन्यांचा समावेश आह़े दरम्यान, त्याने र्मयादित षटकांचा एकही सामना खेळला नाही़

Web Title: Irfan ready to play in the entire domestic season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.