अटीतटीच्या लढतीत आयर्लंडची यूएईवर मात
By Admin | Updated: February 25, 2015 17:21 IST2015-02-25T17:02:51+5:302015-02-25T17:21:13+5:30
आयर्लंडविरुध्द युनायटेड अरब इमिरटस(यूएई )यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात आयर्लंडने यूएईवर ४ चेंडू व २ गडी राखून विजय मिळवला.

अटीतटीच्या लढतीत आयर्लंडची यूएईवर मात
ऑनलाइन लोकमत
ब्रिस्बेन, दि. २५ - आयर्लंडविरुध्द संयुक्त अरब अमिरात (यूएई ) यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात आयर्लंडने यूएईवर ४ चेंडू व २ गडी राखून विजय मिळवला.
अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या लढतीत कधी आयर्लंडचे तर कधी यूएईचे पारडे जड वाटत होते परंतू अखेर आयर्लंडने यूएईवर अखेरच्या षटकात ४ चेंडू राखून विजय मिळविला. वर्ल्डकपमधील या विजयाने आयर्लंडचा हा दुसरा विजय आहे. दक्षिण आफ्रिका संघाचा पहिल्याच लढतीत पराभव करीत आयर्लंडने हम भी कुछ कम नही हे दाखवून दिले होते. प्रथम फलंदाजी करताना यूएईने ५० षटकात ९ बाद २७८ धावा करण्यात यश मिळवले. यूएईचे आव्हान पेलण्यासाठी उतरलेल्या आयर्लंडची सुरुवात समाधारनकारक झाली नाही. सलामीला आलेला स्ट्रीलाइंग अवघ्या ३ धावा काढून बाद झाला. आयर्लंडकडून सर्वाधिक ८० धावा या विल्सनने केल्या. ओबोरीएन ५०, बलबिर्नी ३०, जॉएस ३७, पोर्टफिल्ड ३७, मुनी २ , कुसक नाबाद ५ तर डॉकरेलने केलेल्या नाबाद ७ धावांच्या बळावर आयर्लंडने हा सामना ४ चेंडू व २ गडी राखून जिंकला.