आयपीएलची धूम आजपासून!

By Admin | Updated: April 5, 2017 06:24 IST2017-04-05T06:24:10+5:302017-04-05T06:24:10+5:30

जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधून घेणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) दहाव्या थराराला बुधवारपासून हैदराबाद येथून सुरुवात होईल

IPL today! | आयपीएलची धूम आजपासून!

आयपीएलची धूम आजपासून!

हैदराबाद : जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधून घेणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) दहाव्या थराराला बुधवारपासून हैदराबाद येथून सुरुवात होईल. एकीकडे करोडो क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असताना, स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितच स्पर्धेचा सलामीचा सामना खेळवला जाईल.
काही प्रमाणात प्रेक्षकांमध्ये नाराजीदेखील आहे. कोहलीसह अनेक भारतीय खेळाडू या पूर्ण स्पर्धेत किंवा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये खेळणार नसल्यामुळे स्पर्धेची रंगत काही अंशी कमी झाली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर व सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्याने यंदाच्या आयपीएल तडक्याला सुरुवात होईल. यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे, प्रत्येक संघाच्या घरच्या मैदानावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. म्हणजे यावर्षी आठ ठिकाणी उद्घाटनाच्या कार्यक्रमाचा जल्लोष होईल. मुख्य उद्घाटन कार्यक्रमाला बुधवारी हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियममध्ये संध्या. ६ वाजता सुरुवात होईल.

Web Title: IPL today!