न्यायालयाच्या परवानगीने पुण्यात एक मे रोजी आयपीएलचा सामना

By Admin | Updated: April 20, 2016 13:53 IST2016-04-20T13:53:24+5:302016-04-20T13:53:24+5:30

मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी बीसीसीआयला १ मे रोजी पुण्यातील एमसीएच्या स्टेडियमवर आयपीएलचा सामना खेळवायला परवानगी दिली.

IPL match against Pune on May 1 with the permission of the court | न्यायालयाच्या परवानगीने पुण्यात एक मे रोजी आयपीएलचा सामना

न्यायालयाच्या परवानगीने पुण्यात एक मे रोजी आयपीएलचा सामना

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २० - मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी बीसीसीआयला  १ मे रोजी पुण्यातील एमसीएच्या स्टेडियमवर आयपीएलचा सामना खेळवायला परवानगी दिली. न्यायमूर्ती व्ही.एम.कानडे आणि न्यायमूर्ती एम.एस.कर्णिक यांच्या खंडपीठाने रायझिंग पुणे सुपर जायटंस आणि मुंबई इंडियन्समध्ये होणा-या सामन्याला परवानगी दिली. 
 
बीसीसीआयने या सामन्याला परवानगी मिळावी म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.  पुण्याचा घरच्या मैदानावर २९ एप्रिलला गुजरात लायन्स विरुद्ध आणि त्यानंतर एक मे ला मुंबई इंडियन्स विरुद्ध सामना नियोजित आहे. २९ तारखेचा सामना झाल्यानंतर लगेच एका दिवसात दुस-या मैदानावर सामना हलवणे शक्य नसल्याचा युक्तीवाद बीसीसीआयने न्यायालयात केला. 
 
महाराष्ट्रात दुष्काळ असल्याने न्यायालयाने ३० एप्रिलनंतर महाराष्ट्रात आयपीएलचे सामने खेळवायला मनाई केली आहे. त्यामुळे एक मे च्या पुण्यातील सामन्यासाठी बीसीसीआयने न्यायालयात याचिका दाखल करुन परवानगी घेतली. 
 

Web Title: IPL match against Pune on May 1 with the permission of the court