आयपीएलमुळे इतर खेळांना प्रोत्साहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2016 03:22 IST2016-03-10T03:22:03+5:302016-03-10T03:22:03+5:30
सलग ९व्या वर्षी इंडियन प्रिमीयर लीगचे (आयपीएल) प्रसारण करण्यास सज्ज असल्याचे सांगताना सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाच्या (एसपीएन) अधिकाऱ्यांनी नुकताच

आयपीएलमुळे इतर खेळांना प्रोत्साहन
मुंबई : सलग ९व्या वर्षी इंडियन प्रिमीयर लीगचे (आयपीएल) प्रसारण करण्यास सज्ज असल्याचे सांगताना सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाच्या (एसपीएन) अधिकाऱ्यांनी नुकताच आपल्या ‘एक इंडिया हॅप्पीवाला’ या मोहिमेची घोषणा केली. शिवाय आयपीएलमुळे इतर खेळांना प्रोत्साहन मिळत असून, यामध्ये सोनी पिक्चर्सचा सहभाग असणे आमच्यासाठी गर्वाची बाब आहे, असे एसपीएनचे सीईओ एन. पी. सिंग यांनी सांगितले.
मुंबईमध्ये बुधवारी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या दिमाखदार कार्यक्रमात आयपीएलच्या नवव्या सत्रासाठी आम्ही सज्ज असल्याचे सांगताना सोनी पिक्चर्सने आतापर्यंत आयपीएलच्या झालेल्या ८ सत्रांतील कॅम्पेनकडे लक्ष वेधले. ‘क्रिकेटमुळे देशातील जनता एकत्रित येते. या वेळी सर्व जण भारतीय असतात. आज क्रिकेटच्या या लीगच्या तुफानी यशानंतर अनेक खेळांच्या लीग अस्तित्वात आल्या. ही नक्कीच आनंदाची बाब आहे आणि यामुळे इतर खेळांचाही विकास होत आहे. विशेष म्हणजे हे सर्व आयपीएलच्या यशामुळे झाले असल्याने याचा अधिक अभिमान आहे,’ असे सिंग यांनी या वेळी सांगितले. (क्रीडा प्रतिनिधी)