IPL 10 - दिल्ली डेअरडेव्हिल्सला मोठा धक्का
By Admin | Updated: March 20, 2017 23:33 IST2017-03-20T23:26:32+5:302017-03-20T23:33:24+5:30
इंडियन प्रीमीयर लीग (आयपीएल)मधील दहव्या सत्राला पाच एप्रिल रोजी सुरुवात होणार आहे, त्यापूर्वीच दिल्लीच्या संघाला धक्का बसला आहे

IPL 10 - दिल्ली डेअरडेव्हिल्सला मोठा धक्का
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 20 - इंडियन प्रीमीयर लीग (आयपीएल)मधील दहव्या सत्राला पाच एप्रिल रोजी सुरुवात होणार आहे, त्यापूर्वीच दिल्लीच्या संघाला धक्का बसला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या अष्टपैलू खेळाडू जेपी ड्युमिनीनं आयपीएलच्या दहाव्या मोसमातून माघार घेतली आहे. ड्युमिनीचा या निर्णयमुळेदिल्ली डेअरडेव्हिल्स संघाला मोठा धक्का मानला जात आहे.
पाच एप्रिल ते २१ मेदरम्यान होणाऱ्या आयपीएलच्या सामन्यात ड्युमिनी दिल्ली संघात खेळणार होता. गेल्या दोन मोसमांपासून दिल्ली डेअरडेव्हिल्सचा सदस्य असणाऱ्या ड्युमिनीने गेल्या वर्षीच्या आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सचं नेतृत्त्वही केलं होतं. पण यंदा त्यानं वैयक्तिक कारणास्तव आयपीएलमधून माघार घेतली असल्याची माहिती दिल्ली डेअरडेव्हिल्सचे मुख्य कार्यकाऱ्यांनी दिली आहे.
इंडियन प्रीमियर लीगच्या दहाव्या सत्रासाठी खेळाडूंचा लिलाव 20 फेब्रुवारी रोजी पार पडला. आयपीएल-10 स्पर्धेचा थरार 29 मार्चला समाप्त होणाऱ्या ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेनंतर 5 एप्रिलपासून सुरू होणार आहे. तर 21 मेला स्पर्धेतील अखेरचा सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. दहा वर्षांतील ही अखेरची स्पर्धा आहे. तब्बल 47 दिवस हे सामने खेळवले जाणार आहेत. प्रत्येक संघ 14 सामने खेळेल. यातील 7 सामने त्या संघाच्या घरच्या मैदानावर खेळवले जातील