आयओसी, बीपीसी विजयी

By Admin | Updated: March 18, 2015 23:04 IST2015-03-18T23:04:26+5:302015-03-18T23:04:26+5:30

IOC, BPC won | आयओसी, बीपीसी विजयी

आयओसी, बीपीसी विजयी

>आंतर तेल कंपनी क्रिकेट स्पर्धा, वसीम जाफरचे आक्रमक अर्धशत

पुणे : पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित टष्ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) संघाने आदित्य तरे (८६), वसीम जाफर (७२), चेतेश्वर पुजारा (५०) यांच्या आक्रमक अर्धशकाच्या जोरावर हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचा (एचपीसीएल) ९३ धवांनी पराभव केला.
पूना क्लबवर हा सामना झाला. एचपीसीएल संघाने प्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली. आयओसीच्या फलंदाजांनी त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरवत एचपीसीएलच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. आयओसीएल संघाने निर्धारीत २० षटकांत १ गडी गमावून २२१ धावांचा डोंगर उभारला. चेतेश्वर पुजारा ३८ चेंडूत ५० धावा टोलावत तंबुत परतला. आदित्य तरे याने ५७ चेंडूत नाबाद ८६ धावांची आक्रमक खेळी केली. तर वसीम जाफर याने केवळ २७ चेंडूत ७३ धावा तडकावत संघाला दोनशे धावांचा टप्पा पार करुन दिला. सलमान खान याने एकमेव बळी घेतला.
या आव्हानाचा पाठलाग करताना एचपीसीएल संघाचा डाव २० षटकांत ७ बाद १२७ धावांत आटोपला. प्रसाद पवार याने ४८ चेंडूत ७१ धावांची खेळी करीत चांगली झुंज दिली. संतोष शे˜ी याने ३२ चेंडूत ३१ धावा करीत पवारला साथ दिली. इतर फलंदाज धावा करण्यात अपयशी ठरले. आयओसीएलच्या मुर्तजा हुसेन याने १९ धावांत ३ बळी घेत संघाची फलंदाजी मोडून काढली.

Web Title: IOC, BPC won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.